जर पॉटिंग दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला असता तर?

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:50

क्रिकेटमधून निवृत्ती घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. मात्र निवृत्तीचा तो दिवस प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतोच. कधी निवृत्ती घेणं बातमी होते तर कधी वेळेवर निवृत्ती न घेणं सुद्धा... निवृत्तीच्या बातम्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग चर्चेत आला होता. कारण त्यानं टेस्ट क्रिकेटला दोन वर्ष जास्त दिल्याची चर्चा आहे.

वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाची किंवीसमोर `कश्मकश`

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:54

वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला स्वस्तात बाद केलं आणि टीम इंडियाला खिंडीत गाठलंय.

‘द वॉल’ राहुल द्रविडला जॅक कॅलिसनं टाकलं मागे!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 18:53

दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.

स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)

Last Updated: Thursday, December 26, 2013, 19:26

LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)

स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (टेस्ट मॅच)

Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:59

LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (पहिली टेस्ट)

ऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर ३-० ने कब्जा

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 12:36

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत अॅशेस मालिकेवर कब्जा केलाय. ऑस्ट्रेलियाने २००६-२००७ नंतर पुन्हा एकदा ही मालिका आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.

वन-डे गमावली, धोनीच्या यंगिस्तानची टेस्टसाठी अग्नीपरिक्षा!

Last Updated: Saturday, December 14, 2013, 17:50

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढं भारतीय बॅट्समन पात्रता काय आहे. याचा ट्रेलर साऱ्यांना वन-डे सीरिजमध्ये पहायला मिळाला. आता तर टेस्टमध्ये अग्निपरीक्षाच असणार आहे. आफ्रिकन बॉलर आपल्या पेस ऍटॅक भारतीय टीमला उद्धस्त करण्याचे बेत आखत असणार. यामुळंच धोनी अँड कंपनीला सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.

टेस्टमध्ये अश्विन इज द बेस्ट, नं. १ कायम!

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 08:37

भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे.

रोहितचे शतक, भारताच्या ६ बाद ३५४ धावा

Last Updated: Thursday, November 7, 2013, 17:03

भारताच्या रोहित शर्माने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत चांगली भागिदारी केली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३५४ धावा करत, वेस्ट इंडिजवर १२० धावांची आघाडी घेतली. रोहितला चांगली साथ देत आर. आश्विनने नाबाद ९२ धावा केल्या आहेत. तोही आता शतकापासून ८ पावले दूर आहे.

'मास्टर ब्लास्टर'चा ऑटोग्राफ मिळवायचाय, तर...

Last Updated: Thursday, November 7, 2013, 08:30

लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिटायर होतोय... त्याची शेवटची मॅच पाहण्यासाठी आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी कित्येक चाहते आशेवर आहेत...

१९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा सचिनवर वर्षाव!

Last Updated: Monday, October 28, 2013, 09:33

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल. यावेळी १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सचिनवर केला जाणार आहे. एवढंच नाही तर १९९ फुगे सुद्धा आकाशात सोडले जातील. सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

माझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 15:13

चॅम्पियन्स लीगमध्ये अखेरची मॅच खेळल्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र ज्या क्रिकेटवर नितांत प्रेम केलं, त्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मी अधिक भावनाविवश झालो, असं मत व्यक्त करत द्रविड म्हणाला की, टेस्ट क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे.

दिल्ली टेस्ट - सचिन शेवटची टेस्ट खेळतोय?

Last Updated: Saturday, March 23, 2013, 11:54

ऑस्ट्रेलियाविरूद्ध दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर सुरू असलेली सीरिजमधील चौथी टेस्ट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकरता भारतातील अखेरची टेस्ट ठरू शकते, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

घरच्या मैदानावर धवन खेळाला मुकणार?

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 11:20

टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवननं मोहालीत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मोहालीवर कब्जा करता आला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ मार्च रोजी होणाऱ्या आपल्या घरच्या मैदानावर मात्र शिखर धवन खेळणार नसल्याचं चित्र दिसतंय.

दोन टेस्टसाठी आज निवड, सेहवागचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 11:31

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. सध्या खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या भवितव्याबाबत निवड समिती काय निर्णय घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 रन्सची आघाडी

Last Updated: Sunday, February 24, 2013, 17:47

चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 रन्सची आघाडी घेतली आहे. दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट्स गमावत 515 रन्स केल्या आहेत.

भारत X ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज- तिसरा दिवस

Last Updated: Sunday, February 24, 2013, 17:36

चेन्नई टेस्टचा तिसरा दिवस हा टीम इंडियाचा ठरला. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने डबल सेंच्युरी झळकवली तर विराट कोहलीनेही टेस्ट करिअरमधील चौथी सेंच्युरी झळकावली.

ऑस्ट्रेललियाविरूध्द कोहली, धोनीची शतके

Last Updated: Sunday, February 24, 2013, 15:29

ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना तिसऱ्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर विरोट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदात शतके झळकावलीत.

भारताच्या लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स

Last Updated: Sunday, February 24, 2013, 12:35

टीम इंडियाचा डाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या जोडीने सावरला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स केल्या.

द्रविडने काढले टीम इंडियाचे वाभाडे

Last Updated: Monday, December 10, 2012, 19:21

कोलकाता कसोटीमध्ये पानिपत झालेल्या भारतीय संघातील खेळाडुंच्या कौशल्याबद्दल आणि क्षमतेबद्दल भारताचा माजी कसोटीवीर राहुल द्रविडने टीम इंडियातील खेळाडूंचे वाभाडे काढले आहे.

टीम इंडिया घोषित, युवी-जहीरला डच्चू

Last Updated: Sunday, December 9, 2012, 14:39

चौथ्या आणि शेवटच्या नागपूर कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीममधून झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला आहे. तर टी-२० संघही जाहीर करण्यात आलाय.

सचिन, युवीने सावरले

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 14:30

गेल्या अनेक इनिंगपासून चाहत्यांना ज्या इनिंगची अपेक्षा होती तशी इनिंग सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळत असून तो सध्या ५७ धावांवर खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याची झुंजार खेळाडू युवराज सिंग त्याला चांगली साथ देत आहे.

दबावाखाली कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज!

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 08:55

मुंबई टेस्टटमध्ये इंग्लिश आर्मीकडून धोनी अॅन्ड कंपनीला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे सीरिजमध्ये कमबॅकसाठी कोलकाता टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

युवराज म्हणतो, सगळ्याचा बदला घेणार...

Last Updated: Friday, November 9, 2012, 23:18

गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत हिंदुस्थानला ४-० अशा फरकाने पराभूत करीत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.

...तरीही, सचिन टॉपवरच

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 13:30

वर्षभरापासून सचिनला सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं आहे. असं असलं तरी,भारताकडून २०११ सीझनमध्ये टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय प्लेअर्समध्ये त्याचा नंबर टॉपवर असलेल्या विराट कोहलीनंतर लागतोय.

इंडियाचा लाजीरवाणा पराभव

Last Updated: Saturday, January 28, 2012, 13:07

ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला लाजीरवाणा व्हाइटवॉश मिळाला. कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा तब्बल २९८ धावांनी पराभव केला. या दमदार विजयाच्या बळावर मालिका ४-० अशा मोठ्या फरकाने जिंकण्यात कांगारूंना यश आले आहे.

मॅच वाचवण्याचं आव्हान, खराब सुरवात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:50

भारतासमोर आस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे, भारताला मॅच वाचवण्याचं आव्हान आहे. त्यातच टीम इंडियाची सुरवात ही पुन्हा एकदा खराब झाली आहे. धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग फक्त ४ रन्स बनवून तंबूत परतला आहे.

प्रतिक्षा आता शतकाची.....

Last Updated: Thursday, November 24, 2011, 15:39

मुंबई टेस्टच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ३ विकेट् गमावून २८१ रन्स केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ६७ रन्सवर तर व्हीव्हीएस लक्ष्मण ३२ रन्सवर खेळत आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजची पहिली इनिंग ५९० रन्सवर संपली. त्यानंतर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागनं भारताला ६७ रन्सची धडाक्यात ओपनिंग दिली.

वानखेडे टेस्ट पाहा ५० रूपयात...

Last Updated: Saturday, November 19, 2011, 11:45

वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडचे पाच दिवसांचे तिकीट ५०० रुपये आहे. तर सुनिल गावसकर स्टँडचे लोअर स्टँडचे तिकीट १५० रुपये आहे. त्याचप्रमाणे अप्पर स्टँडचे तिकीट ५०० रुपये आहे. विठ्ठल दिवेच्या पॅव्हेलियनचे तिकीट ६०० रुपये आहे. तर एका दिवसाची तिकीटे अनुक्रमे १०० रुपये, ५० रुपये.

वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 07:36

वेस्ट इंडिजची पहिली इनिंग केवळ १५३ रन्सवरच गडगडली. अजूनही वेस्ट इंडिज ४७८ रन्सने मागे आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला आहे. फॉलोऑन साठी आलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात पुन्हा एकदा खराब झाली. उमेश यादवने पहिली विकेट घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त धक्का दिला

द. आफ्रिकेने ऑसींना चारली धूळ

Last Updated: Friday, November 11, 2011, 18:14

केपटाऊन येथे झालेल्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट मॅच रंगतदार झाली मात्र यामध्ये द. आफ्रिकेने बाजी मारली. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व राहिलं ते दोन्ही टीमच्या बॉलर्सचं.