जडेजाने वापरले अपशब्द, १० % मानधन कट, Jadeja uses bad words

जडेजाने वापरले अपशब्द, १० % मानधन कट

जडेजाने वापरले अपशब्द, १० % मानधन कट
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

भारत-ऑस्ट्रेलियामधील शेवटचा सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शेन वॉटसनला अपशब्द वापरल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला दंड ठोठावण्यात आला आहे.

बंगळूरू येथे हा शेवटचा सामना झाला होता. यावेळी जडेजाने वॉटसनला आऊट केल्यानंतर अपशब्द वापरले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल २.१.४ नियमानुसार त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे जडेजाचे १०% मानधन कापण्यात येणार आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर जडेजाने चूक झाल्याचे कबूल केले होते. पंच अँडी पाइक्रोप्ट यांनी ठोठावलेला दंड जडेजाने मान्य केला होता.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 4, 2013, 21:55


comments powered by Disqus