Last Updated: Tuesday, February 18, 2014, 13:28
www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टनवेलिंग्टन कसोटीत विराट कोहलीन शानदार शतक झळकावलं आहे. विराट कोहलीने १२९ चेंडूत हे शतक झळकावलं आहे.
मॅक्क्युलमच्या त्रिशतकी खेळीनंतर घायाळ झालेल्या टीम इंडियासाठी विराटची खेळी दिलासा देणारी आहे.
विराट कोहलीची खेळी टीम इंडियाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
विराटला यासाठी पिचवर टीकून राहणं महत्वाचं आहे. कारण न्यूझीलंडने टीम इंडियाचे सलामीचे फलंदाज स्वस्तात परतवले आहेत.
टीम इंडियाला कमी अवधित जास्त धावसंख्या उभारण्याचीही गरज आहे. यामुळे बिकट परिस्थितीत विराटचं शतक आणि पुढील खेळी टीम इंडियाला दारूण पराभवापासून वाचवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
याआधी मुरली विजय ७ तर शिखर धवन २ धावांवर बाद झाले. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा भारताची धावसंख्या ५० पर्यंत घेऊन गेले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 09:56