भारत X न्यूझीलंड : पहिली टेस्ट मॅच, LIVE : india vs New Zealand 2012

पुजाराचे शतक, भारत सुस्थितीत

पुजाराचे शतक, भारत सुस्थितीत
www.24taas.com, हैदराबाद

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने ५ गडी गमावत ३०७ धावा केल्या. पुजारा ११९ आणि कर्णधार धोनी २९ धावा काढून नाबाद राहिले.

भारत व न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून प्रारंभ झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजाराने शतक ठोकून हा निर्णय योग्य ठरवला.

राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मणच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला आणखी एक वॉल मिळाली असून चेतेश्वर पुजारा या भिंतीने शानदार खेळाचा नमुना दाखवत आपली पहिली वहिलं शतक साजरं केलं आहे.

एकीकडे दिग्गज खेळाडू झटपट बाद होत असताना पुजाराने एका बाजूला नांगर टाकत आपलं शतक झळकावलं. त्याने १४ चौकार आणि १ उत्तुंग षटकाराच्या साहाय्याने नाबाद १०० धावा झळकावल्या.

यापूवी चहापानापर्यंत चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने ४ बाद २५० धावा केल्या होत्या. पुजारा नाबाद ९५ खेळत होता.

यापूर्वी सेहवाग ४७, गौतम गंभीर २२, सचिन तेंडुलकर १९ धावांवर बाद झाल्यावर भारताची स्थिती बिकट झाली होती. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कोहलीने (५८) संयमी खेळी करत भारताला सुस्थितीत आणले.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरु झालीय. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय.

टीममध्ये झालेल्या बदलांमधून बाहेर पडून चांगली खेळी खेळण्याचं आव्हान धोनी टीमसमोर आहे. या सत्रात भारतीय टीमला १० टेस्ट, १३ वन डे आणि ३ टी-२० मॅचसोबतच पुढच्या महिन्यात श्रीलंकेत आयसीसी टी-२० वर्ल्डकपही खेळायची कसरत करायचीय.

टीम प्लेअर
भारत – महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, आर. अश्विन, प्रज्ञान ओझा, झहीर खान, ईशांत शर्मा, उमेश यादव, अजिंक्य राहाणे, एस. बद्रीनाथ आणि पीयूष चावला

न्यूझीलंड – रॉस टेलर (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, डग ब्रासवेल, डेनयल फ्लिन, जेम्स फ्रेंकलिन, मार्टिन गुप्टिल, क्रिस मार्टिन, ब्रँडन मैक्युलम, तरुण नेथुला, जीतन पटेल, टीम साऊदी, क्रगर वान विक, नील वेगनेर, बी जे वाटलिंग आणि केन विल्यम्स.

First Published: Thursday, August 23, 2012, 09:22


comments powered by Disqus