MCA निवडणूक : शरद पवारांच्या निवडीला मुंडेंचे आव्हान, MCA elections : Gopinath Munde vs Sharad Pawar

MCA निवडणूक : शरद पवारांच्या निवडीला मुंडेंचे आव्हान

MCA निवडणूक : शरद पवारांच्या निवडीला मुंडेंचे आव्हान
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लढतीमध्ये बाळ महाडदळकर ग्रुपचं वर्चस्व दिसून आलं. १६ पैकी १२ जागा या गटानं पटकावल्या. तर विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलनं चार जागांवर आपलं वर्चस्व स्थापन केलं. तर दुसरीकडे भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी न्यायालयात या निवडणुकीविरोधात धाव घेतली आहे.

क्रिकेट फर्स्ट पॅनलवर विजय पाटील आणि रवी सांवत उपाध्यपदी निवडून आले. तर खचिनदारपदी विनोद देशपांडे निवडून आले. संयुक्त सचिवपदी पी.व्ही. शेट्टी आणि नितीन दलाल यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदी निव़ड होताच शरद पवार यांनी एमसीएला दिवाळी गिफ्ट दिलंय. एमसीएसाठी ठाणे-कल्याण सीमेवर भूखंड मिळाल्याची माहिती पवारांनी दिली. तर दुसरीकडे एमसीएचं कामकाज कसं होतं हे पाहण्यासाठी बैठकीला आवर्जून हजर असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

MCAच्या निवडणुकीतून अर्ज बाद झाल्यानंतर आणि MCAकडे दाद मागूनही निवडणूक लढता न आलेल्या गोपीनाथ मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या निर्णयांविरोधात मुंडेंनी नगर व दिवाणी सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज केला. यात एमसीए, एमसीए अध्यक्ष, संयुक्त सचिव, शरद पवार, संजीव गोडवारकर, सी.टी. संघवी यांना प्रतिवादी करण्यात आलंय. या याचिकेवर निकाल येत नाही, तोपर्यंत शरद पवार यांना MCA अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यास मनाई करण्याची मागणीही मुंडेंनी या याचिकेत केलीये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, October 19, 2013, 08:27


comments powered by Disqus