Last Updated: Thursday, October 17, 2013, 12:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी एमसीए अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या अर्जावर बीड येथील पत्ता टाकला आणि मुंडे वादात अडकले. त्यांचा हा पत्ता एमसीए निवडणुकीतून पत्ता कट ठरण्यास कारणीभूत ठरला. त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. आता मुंडे कोर्टात धाव घेणार आहेत.
बुधवारी मुंडे आणि त्यांच्या वकिलांनी एमसीएसमोर आपली बाजू स्पष्ट केली. मात्र, ही बाजू ऐकल्यानंतर एमसीएने गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवारीबाबत निर्णय जाहीर केला. मुंडे यांच्या अर्जावर आक्षेप घेणारे सिंघवी हे एमसीए कमिटीबाहेरील असून शरद पवारच आक्षेप नोंदवू शकतात असा युक्तिवाद मुंडेकडून केला गेला होता. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नसल्याचे या निर्णयावरून स्पष्ट झाले.
मुंडेचा अर्ज बाद ठरविल्याने एमसीएत पवारांचीच मक्तेदारी कायम असून पवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुंडेनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार आहे. बाहेरच्या लोकांकडून आक्षेप घेतला गेल्याचा आरोप मुंडेंनी केला आहे. तसंच अध्यक्षपदाच्या अर्जाबाबत एमसीएचा निर्णय विरोधात गेल्यास कोर्टात जाऊ असा इशाराही गोपिनाथ मुंडेनी दिला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 17, 2013, 12:29