वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मॉडेलसोबत विवाहबद्ध Mohammed shami married with model Hasan

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मॉडेलसोबत विवाहबद्ध

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मॉडेलसोबत विवाहबद्ध
b>www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली

भारतीय क्रिकेट संघातला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी शुक्रवारी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहाच्या बंधनात अडकला.

या वेगवान गोलंदाजकला कोलकत्ताची मॉडेल हसीन जहॉंने क्लीन बोल्ड केले. हसीन ही कोलकत्याचे प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मोहम्मद हसन यांची मुलगी असून सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

शमी याने विवाह सोहळा खूप खासगी स्वरुपात पार पाडला. विवाहासाठी परिवारा व्यतिरीक्त ५० खास पाहुण्यांना आमंत्रित केले होते. विवाहाच्या वेळी शमीचे वडील यांनी सांगितले की, “या लग्नामुळे आम्ही खुप खूष आहोत.माझा मुलगा देशासाठी खेळतो, याचा मला अभिमान आहे. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की, मुलाने खूप प्रगती करावी, मोठं व्हावं. तसेच आगामी इंग्लंड दौ-यातही तो चांगल्या प्रकारे कामगिरी करेल. “


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 13:28


comments powered by Disqus