गोनीने रचला आईला घराबाहेर काढण्याचा डाव, mother allegation on indian cricketer

गोनीने रचला आईला घराबाहेर काढण्याचा डाव

गोनीने रचला आईला घराबाहेर काढण्याचा डाव
www.24taas.com, झी मीडिया, पुणे
भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनप्रीत सिंह गोनी यांच्यावर त्याच्याच आईने गंभीर आरोप लावला आहे. मनप्रीत गोनी आपला भाऊ,वहिनी आणि पत्नीसह मिळून आपली संपत्ती हडपण्याचा आणि आपल्याला घरातून हलकण्याचा डाव आखत असल्याचा आरोप त्याची ७० वर्षीय आई मोहिंदर कौर यांनी लावला आहे.

मोहालीत गोनी याचे घर आहे. आईने आरोप लावला की तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. परंतु, पोलीस या प्रकरणात कोणतीह कारवाई करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळणाऱ्या मनप्रीतच्या आईने आरोप लावला की, त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी तो कट रचत आहे. यात त्याची साथ त्याचा मोठा भाऊन मनमोहन सिंह आणि त्याची पत्नी देत आहेत.
मोहालीतील या घरात मोहिंदर कौर खालच्या मजल्यावर एकट्या राहत आहेत. तर वरील मजल्यावर मनमोहन आणि त्याची पत्नी राहतात. तर मनप्रीत जवळच वेगळा राहतो. २९००८ मध्ये आई मुलांचा हा वाद खूप चर्चिला गेला होता.

आजारी आईकडे नाही मिळकतीचं साधन
मनप्रीतची आई मोहिंदर यांच्याकडे मिळकतीचं कोणतचं साधन नाही. ब्लड प्रेशरने त्या आजारी आहे. औषधाच्या खर्चासाठी त्यांनी पेईंग गेस्ट ठेवला होता. पण त्याच्या मोठ्या मुलाने त्याला हलकवून लावले. गोनीला आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन पंजाबने अडीच कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण दुसरीकडे त्याची आई चांगल्या उपचारांपासून वंचित आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 29, 2013, 17:07


comments powered by Disqus