मुरली कार्तिकच्या गाडीला अपघात, पत्नी जखमी, murali kartik met with an road accident wife injured

मुरली कार्तिकच्या गाडीला अपघात, पत्नी जखमी

मुरली कार्तिकच्या गाडीला अपघात, पत्नी जखमी

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक याच्या कारला आज अपघात झाला. समोरून येणाऱ्या गाडीने मुरलीच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरली कार्तिक यांची पत्नी किरकोळ जखमी झाली तर दुसऱ्या कारमधील व्यक्तीच्या हाताला जखम झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला. या वेळी कार्तिक आणि त्याची पत्नी श्वेता ताज मानसिंह हॉटेलहून ग्रीन पार्क स्थित आपल्या घरी जात होते.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक आपली व्होल्वो कार चालवत होता. त्याने आपली कार एका पेट्रोल पंपावर थांबवली होती. पेट्रोल भरल्यानंतर गाडी काढत असताना विमानतळाच्या दिशने येणाऱ्या झायलो कारने त्याला गाडीला समोरून धडक दिली. झायलो कारमधील व्यक्तीच्या डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 19, 2013, 15:47


comments powered by Disqus