Last Updated: Saturday, August 17, 2013, 21:26
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनदेखील वन-डे आणि टेस्ट अशा दोन्ही ड्रीम टीम जाहीर केल्या आहेत.
गांगुलीच्या ड्रीम टेस्ट टीममध्ये सुनिल गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, महेंद्र सिंग धोनी, कपिल देव, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ , झहीर खान आणि स्वत:चा समावेश आहे.
विशेष म्हणजे व्ही.व्ही. एस.लक्ष्मणचा टेस्ट टीममध्ये 12वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. तर वन-डेमध्ये स्वत:सहित सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, रविंद्र जाडेजा, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि झहीर खानचा समावेश केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 17, 2013, 21:26