टीम इंडिया विजयी, टेस्टमध्ये १-०ने आघाडी Ojha, Pujara guide India to 9-wicket win

टीम इंडिया विजयी, टेस्टमध्ये १-०ने आघाडी

टीम इंडिया विजयी, टेस्टमध्ये १-०ने आघाडी
www.24taas.com, अहमदाबाद

अहमदाबाद टेस्टमध्ये इंग्लंडनं ठेलवलेल्या ७७ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना टीम इंडियानं एका गड्याच्या मोबदल्यात सामना खिशात टाकला. टीम इंडियाने टेस्टमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे.

शानदार सुरुवात करताना वीरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजारा इंग्लिश बॉलर्सचा यशस्वी सामना केला. मात्र, २५ रन्सवर सेहवाग बाद झाला. पुजारा आणि ओझा टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेत. भारताने नऊ विकेट राखून पाहुण्या इंग्लडला मायभूमीत पहिला धक्का दिला.

पहिल्या कसोटीत जल्लोषात विजय मिळवण्याचं भारताचं स्वप्न पाचव्या दिवशी पूरे झाले. इंग्लिश संघनायक अँलिस्टर कुकच्या नाबाद १६८ रन्सच्या खेळीमुळे इंग्लंडनं आता १० रन्सची आघाडी घेतलीय. आजच्या दिवशी इंग्लंडच्या लवकरच लवकर ५ विकेट्स घेऊन मॅच जिंकण्याचा भारताचा निर्धार होता.

भारतीय फिरकीच्या आव्हानापुढे इंग्लिश संघ लोटांगण घालत असताना रविवारी मात्र टीमचा खंदा नायक जिद्दीनं लढला आणि त्यानं कसोटी कारकिर्दीतली २१ वी सेंच्युरी झळकावली. त्यानं मॅट प्रायरसोबत सहाव्या विकेटसाठी १४१ रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे भारतीय टीमसमोरील अडचणी वाढल्या होत्या.

अहमदाबाद टेस्टमध्ये इंग्लिश टीम ४०६ रन्सवर ऑलआऊट झाली. पहिली टेस्ट जिंकण्यासाठी आता भारताला ७७ रन्सची आवश्यकता होती. कॅप्टन ऍलिस्टर कूकनं १७६ रन्सची झुंजार इनिंग खेळत इंग्लिश टीमची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे सारे प्रयत्न अपुरे पडले. मॅट प्रायरनही ९१ रन्सची इनिंग खेळत कूकबरोबर १५७ रन्सची पार्टनरशीप केली. भारताकडून प्रग्यान ओझानं ४ आणि झहीर खानने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लिश टीमनं ठेवलेलं आव्हान झटपट पार करण्यासाठी आता धोनी अँड कंपनी प्रयत्न करून सहज पार केलं.

First Published: Monday, November 19, 2012, 13:08


comments powered by Disqus