Last Updated: Wednesday, September 12, 2012, 07:22
www.24taas.com, नवी दिल्ली पाकिस्तानचा क्रिकेट संघ २५ डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत भारत दौऱ्यावर येत असून, उभय संघांमध्ये तीन वन डे आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध अधिक सौहार्दाचे करण्याच्या प्रयत्नांना आता आणखी वेग आला आहे.
दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी एकमेकांची व्हिसा प्रक्रिया नुकतीच सुलभ करण्यात आली. त्यापाठोपाठ आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
First Published: Wednesday, September 12, 2012, 07:11