Last Updated: Wednesday, January 2, 2013, 14:25
www.24taas.com, कोलकाता पाकिस्तानी क्रिकेट टीमचा सलामीचा माजी बॅट्समन सादिक मोहम्मदने भारताचा विस्फोटक सलामीचा बॅट्समन वीरेंद्र सेहवागला `आतंकवादी` म्हणून संबोधले आहे. सादिकच्या मते, सेहवागची बॅट जेव्हा तळपते, तेव्हा विरोधी टीमच्या नाकात दम आणते. आणि त्यानंतर त्याला कोणीही रोखू शकत नाही.
सादिकने ईडन गार्डन्समध्ये बोलताना म्हणाला की, जेव्हा सेहवाग बॅटींग सुरू करतो. तेव्हा तो आतंकवाद्या सारखा दिसतो. मी त्याला पूर्ण सन्मान देतो. पण तो जेव्हा बॉलरची धुलाई सुरू करतो तेव्हा त्याला रोखणं कठीण होऊन बसतं.
सादिक भारत आणि पाकिस्तानच्या सुरू असणाऱ्या या सीरीज मध्ये सद्भावना दूत म्हणून भारताच्या दौऱ्यावर आहेत. सादिकने पाकिस्तानच्या सलामीचा बॅट्समन नासिर जमेशद याची प्रशंसा केली आहे. सादिकच्या मते, नासिरमध्ये मोठ्या खेळी करण्याची क्षमता आहे.
First Published: Wednesday, January 2, 2013, 13:01