रणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणारPlan was to make Tendulkar play: Mohit Sharma

रणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणार

रणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणार
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

सचिन तेंडुलकर आज रणजी मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकतो. हरियाणाविरुद्ध मॅचच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागू शकते.

हरियाणाचे पहिल्या इनिंगमध्ये ९ विकेटवर २२४ रन्स झालेत. पहिल्या इनिंगमध्ये सचिन केवळ ५ रन्स बनवून आऊट झाला होता. मात्र आता दुसऱ्या इनिंगमध्ये तो मोठा स्कोअर उभारण्यासाठी तयारीत आहे. त्यासाठी नेटमध्ये सचिननं जोरदार प्रॅक्टिसही केलीय.

तर दुसरीकडे आपल्या करियरच्या शेवटच्या टप्प्यावर असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही उत्कृष्ट खेळाडू असल्याचं मत राहुल द्रविडनं व्यक्त केलंय. सचिनची कुठली इनिंग उत्कृष्ट हे सांगणं कठीण असल्याचं मत राहुलनं एका प्रश्नादरम्यान व्यक्त केलं. शिवाय त्यानं अखेरच्या मॅचमध्ये रन्स केले नाहीत तरी चालेला तो महान खेळाडू आहे आणि राहणार असंही द्रविड म्हणाला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 29, 2013, 10:23


comments powered by Disqus