Last Updated: Wednesday, May 29, 2013, 07:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या वानखेडे स्टेडियममधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे.
वानखेडेमधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव देण्याचा एमसीएचा प्रस्ताव होता. त्यासंदर्भात आज एमसीएच्या पदाधिका-यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वानखेडेमधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव द्यायला परवानगी दिलीय.
त्यामुळे थोड्याच दिवसांत बाळासाहेबांच्या नावाचा प्रेस बॉक्स वानखेडेमध्ये पहायला मिळणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 22:57