सचिनची निवृत्ती, अन् पूनम पांडेचं भांडवल

Last Updated: Friday, November 15, 2013, 18:14

नेहमी आपल्या विचित्र वक्तव्य, विचित्र फोटो यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने पुन्हा सचिनच्या निवृत्तीचं भांडवल केलं आहं. पूनम पांडेने आपल्या हातावर सचिनचा टॅटू काढून घेतला आहे.

सचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक

Last Updated: Friday, November 15, 2013, 11:24

मास्टर इनिंग सचिन तेंडुलकर याने शेवटच्या कसोटीत खेळली. १२ खणखणीत चौकार ठोकत ७४ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे चाहते खूश असले तरी त्याच्या अखेरच्या कसोटीमुळे चाहते भावूक झालेत. वाडखेडेवरील चाहत्यांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली.

मुंबईच्या क्रिकेट पंढरीवर सचिन चाहत्यांची अलोट गर्दी

Last Updated: Friday, November 15, 2013, 08:29

क्रिकेटच्या देवाचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी सगळ्यांची पावलं वळली होती ती मुंबईची क्रिकेट पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमकडं... सचिन तेंडुलकरसाठीही आजची खेळी स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय ठरली... कारण... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

क्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 23:42

वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

वानखेडेच्या पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 19:10

वानखेडे स्टेडिअममधील पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झल्यानंतर आज त्याचा नामकरण सोहळा संपन्न झालाय.

कैलाश खेरनं तयार केलं ‘सचिन अँथेम’

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 17:02

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उद्यापासून सुरू होणारी मॅच त्याच्या कारकीर्दीतली अखेरची मॅच आहे. त्यामुळं देवाच्या निवृत्तीची जोरदार तयारी मुंबईत सुरू आहे. सचिनला ‘बेस्ट ऑफ लक’, ‘वुई मिस यू’ सारखे मॅसेज त्याच्या चाहत्यांकडून मिळतायेत. यातच आणखी एका व्यक्तीचा समावेश झालाय... तो म्हणजे गायक कैलाश खेर....

सचिनच्या चाहत्यांची पवारांविरोधात घोषणाबाजी

Last Updated: Monday, November 11, 2013, 12:05

वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या मॅचची तिकिटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली. मात्र सकाळी अचानक तिकिटं ऑनलाईन देणार असल्याचं घोषित झाल्यावर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा?

Last Updated: Thursday, November 7, 2013, 23:48

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २०० व्या टेस्ट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागणार असल्यानं मुंबई पोलीस सट्टेबाजांवर आणि सट्टा लावणा-यांवर करडी नजर ठेवणार आहे. तब्बल एक हजार कोटींची सट्टा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे.

सचिनच्या अखेरच्या मॅचला सामान्य चाहते मुकणार?

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:25

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टची उत्सुकता शिगेला पोहलचली आहे. मात्र, सचिनची शेवटची टेस्ट पाहण्याची संधी सामान्य क्रिकेटप्रेमींना कमीच मिळणार आहे.

सचिनच्या आईसाठी वानखेडेवर विशेष रॅम्प!

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 12:01

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडेवर जोरदार तयारी सुरु आहे. सचिनची आई त्याची अखेरची टेस्ट पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणार आहे.

सचिनची लँडमार्क २००वी टेस्ट मॅच होमपीचवर!

Last Updated: Monday, September 2, 2013, 08:26

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली करिअसचं ऐतिहासिक २००वी टेस्ट मॅच आपल्या होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. बीसीसीआयच्या कोलकाता इथं झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौऱ्यावर येत आहे.

वानखेडे स्टेडियममधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 07:40

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे.

शाहरुख `एमसीए`शी पंगा घेणार?

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 16:51

क्रिकेटरसिकांसहीत अनेकांचे डोळे मात्र दुसऱ्याच एका मुद्द्यावर लागलेत. तो म्हणजे, या मॅचसाठी शाहरुख वानखेडेवर जाणार का?

महाशतकाची पुन्हा हुलकावणी

Last Updated: Friday, November 25, 2011, 05:27

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली आहे. रवी रामपॉलनं सचिनला ९४ रन्सवर आऊट केलं. सचिनची शंभरावी सेंच्युरी हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.

विंडीज फलंदाजी बहरात, ब्राव्होचे शतक

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 07:20

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही विंडीजने दमदार सुरूवात करून तीन बाद ४१६ रन्स केल्या.

वानखेडे टेस्ट पाहा ५० रूपयात...

Last Updated: Saturday, November 19, 2011, 11:45

वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडचे पाच दिवसांचे तिकीट ५०० रुपये आहे. तर सुनिल गावसकर स्टँडचे लोअर स्टँडचे तिकीट १५० रुपये आहे. त्याचप्रमाणे अप्पर स्टँडचे तिकीट ५०० रुपये आहे. विठ्ठल दिवेच्या पॅव्हेलियनचे तिकीट ६०० रुपये आहे. तर एका दिवसाची तिकीटे अनुक्रमे १०० रुपये, ५० रुपये.