सिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं!, PV Sindhu loses in semis, settles for bronze at WBC

सिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं!

सिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं!
www.24taas.com, झी मीडिया, ग्वांग्झू

पी. व्ही सिंधूचं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकावण्याचं स्वप्न भंगलंय. सेमी फायनलमध्ये तिला थायलंडच्या तिसऱ्या मानांकित राचनोक इन्तनॉनकडून पराभव स्वीकारावा लागला.

राचनोकनं सिंधूचा २१-१०, २१-१३ नं पराभव केला. सेमी फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानं सिंधूला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं आहे. जवळजवळ ३६ मिनिटांपर्यंत चाललेल्या या सामन्यात जगातील तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या राचनोकच्या विरुद्ध सिंधूला सरळसरळ पराभव स्विकारावा लागला. शुक्रवारी चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये धडक देऊन कांस्यपदक निश्चित करणाऱ्या सिंधूला आज मात्र नमतं घ्यावं लागलं.

सिंधू सेमी फायनलमध्ये पराभूत झाली असली तरी तिनं ३० वर्षानंतर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला वैयक्तिक मेडल पटकावून दिलं आहे. याआधी १९८३ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी ब्राँझ मेडलची कमाई केली होती तर अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टानं वुमेन्स डबल्समध्ये २०११ मध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं.

आता सिंधूनही ब्राँझ पटकावत साऱ्यांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय सायना नेहवालनं निराशा केल्यानंतर सिंधूनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013, 17:40


comments powered by Disqus