आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

Last Updated: Monday, October 14, 2013, 15:40

मुंबईच्या चिराग शेट्टीने आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकलं आहे. त्याने सहा वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता सावंतच्या विक्रमाची बरोबरी करताना एम. आर. अर्जुनच्या साथीत सतरा वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर भारताच्या सिरील वर्माने पंधरा वर्षांखालील एकेरीत बाजी मारली.

सुसाट बोल्टची ‘गोल्डन हॅट्रीक’!

Last Updated: Monday, August 19, 2013, 15:22

जमैकाचा स्टार उसेन बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या गोल्ड मेडलला गवसणी घालत, गोल्ड मेडलची हॅट्रीक केलीय. 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत जमैकाच्या टीमनं गोल्ड मेडल पटकावलं असून रिले टीममध्ये बोल्टचा समावेश होता. या गोल्डमेडलनं बोल्टनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन मेडल मिळवत हॅट्रीक केली.

सिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:40

पी. व्ही सिंधूचं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकावण्याचं स्वप्न भंगलंय. सेमी फायनलमध्ये तिला थायलंडच्या तिसऱ्या मानांकित राचनोक इन्तनॉनकडून पराभव स्वीकारावा लागला.

राही सरनौबतला शूटिंग वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल

Last Updated: Friday, April 5, 2013, 16:55

महाराष्ट्राची शूटर राही सरनौबतने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे.

बोल्टने गोल्ड मिळवलं वेगात...

Last Updated: Monday, August 6, 2012, 10:18

लायटनिंग ऊसैन बोल्ट जगातला सर्वात वेगवान मानव ठरला आहे... वाऱ्याशीही स्पर्धा करणारा ऊसैन बोल्टने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. आणि आता हा विश्वविक्रम त्याने पुन्हा एकदा स्वत:चाच रेकॉर्ड मोडून रचला आहे.

मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 13:12

ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.

'नानाचा नेम चुकला', आणि 'नाना चुकचुकला'

Last Updated: Saturday, November 19, 2011, 12:15

चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारणारा नाना पाटेकर पाचव्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला होता. नानानं 50 मीटर राफयल प्रोन प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र, या चॅम्पियनशिपमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.