Last Updated: Thursday, June 13, 2013, 17:39
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्लीस्पॉट फिक्सिंगनंतर क्रिकेट विश्व ढवळून निघालेल्या प्रकरणाने भल्याभल्यांना कामाला लावलय. या प्रकरणात अडकलेले निलंबित राजस्थान रॉयलचे सहमालक राज कुंद्रा हे सध्या देवपूजेला लागलेत.
गेल्या अनेक दिवसांपासून स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाने राज आणि शिल्पा हे दोघंही अस्वस्थ आहेत. हीच अस्वस्थता घालवण्यासाठी राज हे देवाची पूजाअर्चा करतायेत. राज यांनी ट्विट केलंय, माझ्यासाठी हा पूर्ण पवित्र दिवस आहे. मी आठ तास देवांची पूजा करण्यात घालवलेत. हे सगळं विश्वास कायम ठेवण्यासाठी चालू आहे.
फिक्सिंगप्रकरणानंतर आईने मला मोठा आधार दिलाय. हे राजची पत्नी शिल्पा हिने ट्विट केलंय. तिने तसे आईचे ट्विटवर आभार मानलेत. यात तिने असं म्हटलयं की, आईच्या बोलण्याने मला बळ दिलयं. माझ्या पालकांच्या प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी या परिस्थितीला धिराने तोंड देत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 17:31