रणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून..., Ramesh Powar to play for Rajasthan

रणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून...

रणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऑफ स्पिनर रमेश पोवार आगामी रणजी ट्रॉफी क्रिकेट सत्रात मुंबईकडून नव्हे तर राजस्थानकडून खेळणार आहे. पोवारनं राजस्थान क्रिकेट संघाबरोबर दोन वर्षांचा करार पक्का केलाय.

टीममधला त्याचा पूर्वीचा साथी आणि मित्र ऋषिकेश कानिटकरनं त्याला राजस्थान टीमशी जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. २००२-०३ साली बॅटींग आणि बॉलिंगमध्येही आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन पोवारनं केलं होतं, त्यामुळेच मुंबई संघाला रणजी किताब मिळवण्यास सोप झालं होतं.

‘गेल्या १३-१४ वर्षांपासून मी मुंबई संघातर्फे खेळतोय. त्यामध्ये काही नवंपण राहीलं नव्हतं त्यामुळे मी राजस्थान टीममधून खेळण्याचा निर्णय घेतला. मुंबईसारख्या टीमसोबत खेळण्याचा अनुभवच वेगळा होता आम्ही नेहमी जिंकण्यासाठीच मैदानात उतरतो. राजस्थाननंही सलग दोन वर्ष रणजी चॅम्पियनपद भूषवलंय... इथंही मी माझा खेळ असाच ठेवण्याचा प्रयत्न करीन’ असं पोवारनं यावेळी म्हटलंय.

३५ वर्षांच्या पोवारला आता पुन्हा एकदा राष्ट्रीय टीममधून खेळण्याची आशा आहे. आपल्या फिटनेसवर काम करीत त्यानं त्याचं वजनही थोडंफार कमी केलंय. पोवारनं दोन टेस्ट आणि ३५ एकदिवसीय मॅचमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013, 20:01


comments powered by Disqus