चर्चा तर होणारच... न्यूझीलंड दौऱ्याआधी विराट ५ दिवस अनुष्काकडे?Ranveer Singh brought together Anushk

चर्चा तर होणारच... न्यूझीलंड दौऱ्याआधी विराट ५ दिवस अनुष्काकडे?

चर्चा तर होणारच... न्यूझीलंड दौऱ्याआधी विराट ५ दिवस अनुष्काकडे?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टीम इंडियाचा विस्फोटक असा बॅट्समन विरोट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या खूप चर्चेत आहेत. चर्चा तर होणारच... कारण त्यांच्यातली मैत्रीनं आता प्रेमाचं रूप घेतलंय.

टीम इंडियाचा हा धडाकेबाज बॅट्समन न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्याआधी तब्बल पाच दिवस अनुष्का शर्माच्या फ्लॅटवर होता, अशी माहिती मिळतेय. यापूर्वीही दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतल्यावर विराट कोहली टीमच्या इतर खेळाडूंसोबत जाण्याऐवजी त्यानं अनुष्का शर्मानं पाठवलेल्या कारनं जाणं पसंत केलं. त्यामुळं या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय याचं चित्र स्पष्ट होतंय.

याशिवाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काच्या फॅल्टवर असतांना तिच्या इमारतीतल्या अनेक लोकांनी विराटला ओळखलं. विराटनं पाच दिवस मुंबईत अनुष्कासोबत घालवले, ते ही घरीच... कुठंही न जाता. शिवाय जेव्हा विराट न्यूझीलंड दौऱ्यासाठी निघाला तेव्हा अनुष्का खाली पार्किंगमध्ये त्याला सोडायला सुद्धा आली होती.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली होती. अनुष्कानं याबाबत स्पष्टीकरण देत आम्ही दोघं फक्त मित्रच आहोत. एकत्र फिरण्यानं आणि रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानं आमच्यात रोमान्स सुरू आहे, हे होत नाही. मात्र अनुष्का केवळ चांगला मित्र कोणाच्या घरात इतके दिवस राहत नाही, ते ही कुठंही न जाता...

दरम्यान, एका फिल्मी वेबसाईटनुसार अभिनेता रणवीर सिंग जो की अनुष्काचा एक्स बॉयफ्रेंड आहे...त्यानंच एका पार्टीत अनुष्काची विराटसोबत पहिल्यांदा ओळख करून दिली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 11:02


comments powered by Disqus