माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री घेणार घटस्फोट, Ravi Shastri and Ritu Shastri be divorced

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री घेणार घटस्फोट

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री घेणार घटस्फोट
www.24taas.com,मुंबई

माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत. पत्नी रितुपासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

रवी शास्त्री यांची पत्नी रितु या एका लष्करी अधिका-याची मुलगी असून, नृत्यांगना आहे. घटस्फोट झाल्यानंतर रवी शास्त्री आपले मुंबईतील वरळीचे घर सोडून चर्चगेटमधील `बॅचलर पॅड` मध्ये जाण्याची शक्यता असल्याचेही या वृत्तपत्रात म्हटले आहे.

रवी शास्त्री आणि रितु यांच्यात मतभेद होत असल्याने हा घटस्फोट घेत असल्याचे इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे. यासाठी त्यांनी घटस्फोटाचा अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आता रवी शास्त्री आणि रितु यांच्यातील २२ वर्षांचे वैवाहिक जीवनाला पूर्ण विराम मिळणार आहे.

First Published: Tuesday, November 6, 2012, 12:51


comments powered by Disqus