रजनीकांतनंतर आता रवींद्र जडेजाचे जोक्स..., ravindra jadeja jokes

रजनीकांतनंतर आता रवींद्र जडेजाचे जोक्स...

रजनीकांतनंतर आता रवींद्र जडेजाचे जोक्स...
.
www.24taas.com, मुंबई
गेल्या काही वर्षांपासून सरदारजींच्या जोक्सनंतर रजनीकांतच्या जोक्सने अनेकांच्या मोबाईलवर अधिराज्य गाजवले होते. पण आता त्यांना तोड देण्यासाठी रवींद्र जडेजाचे जोक्सचा प्रसार होत आहे. असे जोक्स पसरविण्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागे नाही त्याने जडेजाच्या बाबतीत असेच काहीचे ट्विट्स केले आहेत.

ढोणीने रवींद्र जडेजाबाबत केलेले ट्विट्स
> रजनी सर म्हातारे होत असल्याची देवाला जाणीव झाल्याने त्याने सर जडेजांना या पृथ्वीतलावर पाठवले.
> लहानपणी खेळताना सर जडेजा यांना एक मातीचा डोंगर बनवायचा होता. आता आपण त्याला माऊण्ट एव्हरेस्ट नावाने ओळखतो.
> जेव्हा तुम्ही सर रवींद्र जडेजांना १ चेंडूत दोन धावा करण्यासाठी सांगता , तेव्हा ते १ बॉल बाकी ठेवून मॅच जिंकून देतात.

रवींद्र जडेजा चेन्नई सुपरकिंग्जचा प्लेअर. पण त्याला सर रवींद्र जडेजा म्हणतात. कारण ते कॅच पकडण्यासाठी कधीही धावत नाहीत. उलट हवेत उडालेला बॉलच त्यांना शोधत येतो आणि त्यांच्याच हातात स्थिरावतो. जेव्हा सर रवींद्र सरावासाठी मैदानावर जाण्याचा विचार करतात , तेव्हा खुद्द मैदानच त्यांच्या दिशेने येऊ लागतं. ही वाक्य ऐकायला जरा `अति ` वाटत असली तरी सध्या सोशल साइट्सवर रवींद्र जडेजाबाबत अशा पोस्टने धम्माल उडवून दिली आहे.
सोशल साइट्सवरची मंडळी रवींद्रवर जाम फिदा आहेत. त्याच्यावर अशा अतिशयोक्ती कमेंट्सचा पाऊस पडतोय. अर्थात यात काही क्रिकेटपटूही सहभागी आहेत. काही दिवसांपूर्वी विकीपिडियावर कोणी एकाने रवींद्रचे खोटे पेज सुरु केलं. त्यावर तो परोपकारी , लोकपुरस्कृत हीरो आणि नोबेल पुस्कारास योग्य असा असल्याचं म्हटलं होतं. ही बातमी कळल्यानंतर ` चेन्नई सुपरकिंग्ज ` मधल्या त्याच्या माही ढोणी , सुरेश रैना आणि अश्विन यांनी रवींद्रच्या नावापुढे लॉर्ड , श्री श्री पंडीत , सर अशा उपाधी लावायला सुरुवात केली. त्यामुळे हा खेळाडू पुन्हा चर्चेत आला.

First Published: Monday, April 15, 2013, 13:22


comments powered by Disqus