रणजी ट्रॉफीचा सामना रंजक वळणावर

रणजी ट्रॉफीचा सामना रंजक वळणावर

रणजी ट्रॉफीचा सामना रंजक वळणावर

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलच्या मॅचममध्ये मुंबईची टीम दुस-या इनिंगमध्ये 129 रन्सवरच ऑल आऊट झाली. मुंबईच्या एकाही बॅट्समनला महाराष्ट्राच्या बॉलर्सचा सामना करता आला नाही.

मुंबईला झटपट आऊट कऱण्यात यश आलेल्या महाराष्ट्रासमोर 252 रन्सचं टार्गेट आहे. महाराष्ट्राकडून संकलेचानं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मुंडे आणि फलाहनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.

मुंबईकडून सुर्यकुमार यादवनं सेकंड इनिंगमध्येही मुंबईची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याला यश आलं नाही. तिस-या दिवसअखेर महाराष्ट्रानं 1 विकेट गमावून 28 रन्सपर्यंत मजल मारली आहे.

आता सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला महाराष्ट्राला लवकरात लवकर गुंडाळण्याचं आव्हान असेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014, 08:56


comments powered by Disqus