सचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`, Sachin Tendulkar 79th Century in Ranji

सचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`

सचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`
www.24taas.com, मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कित्येक महिन्यांनंतर झालेल्या रणजी स्पर्धेत खेळलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडिअमवर ७९ शतक पूर्ण केलं आहे. सचिननं १०३ चेडूंमध्ये २१ चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत. जानेवारी २०११ नंतरचे सचिनचं हे प्रथम श्रेणीतील पहिलं शतक आहे.

सचिनसोबत अजिंक्य रहाणेने देखील चांगली खेळी खेळला आहे. अजिंक्यनेही बाद न होता आपलं शतक पूर्ण केलंय. सचिन आणि अजिंक्यने चौथ्या विकेटसाठी २०० धावांची खेळी खेळून मुंबईला सुरक्षित स्थानावर पोहोचवलं. अजिंक्यने २०७ चेडूंमध्ये १३ चौकार भिरकावले.

मुंबईने कौस्तुभ पवार, विकेटकिपर आदित्या तारे, रोह्त शर्मा आणि सचिनची विकेट गमावली. रोहितनेही इंगलसोबत होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी गमावली आहे.

तसं पाहायला गेलं तर रेल्वे टीमच्याअनुरित सिंहने यश मिळवलं आहे. अनुरितनं सचिन आणि पवारची विकेट घेतली. सचिननं १०० धावा पूर्ण करण्यासाठी ७४ धावावरून १००धावांवर उडी मारण्यासाठी अवघ्या आठ चेडूंमध्ये काम संपवलं. सुनिल गावस्करचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सचिनला फक्त दोन शतकं कमावयची आहेत.

First Published: Friday, November 2, 2012, 20:30


comments powered by Disqus