सचिन तेंडुलकर नव्या अवतारात, Sachin Tendulkar is the dawn appearing on Cancer

सचिन तेंडुलकर नव्या अवतारात

सचिन तेंडुलकर नव्या अवतारात
www.24taas.com, हैदराबाद

हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका नव्या अवतारात दिसला. मैदानात अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सचिन तेंडुलकर मिशन कॅन्सरशी जोडला गेला आहे.

क्रिकेटची मैदानं गाजवणा-या सचिनने आता मिशन कॅन्सरवर लक्षं केंद्रित केलं आहे. मिशन आहे लोकांना जागरूक करण्याचे आणि या मिशनमध्ये सचिनसोबत आहे त्याचा टीम इंडियाचा जुना सहकारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण.

दरवर्षी गैस्ट्रोइंटेस्टाइनल आणि लिव्हर कॅन्सरमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या कॅन्सरबाबत लोकांना जागरूक करण्याकरता एक फाऊंडेशन स्थापित करण्यात आलंय. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी सचिन आणि लक्ष्मणनेही कॅन्सरविरूद्ध लढण्याची शपथ घेतली.

First Published: Wednesday, March 6, 2013, 13:06


comments powered by Disqus