इराणी ट्राफीत सचिनने झळकावली सेंच्युरी, Sachin Tendulkar made Century in Irani Trophy

इराणी ट्रॉफीत सचिनने झळकावली सेंच्युरी

इराणी ट्रॉफीत सचिनने झळकावली सेंच्युरी
www.24taas.com, मुंबई

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इराणी ट्रॉफीमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली. शेष भारतासोबत मुंबईच्या टीम कडून खेळताना सचिन तेंडुलकरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८१ वी सेंच्युरी झळकावली आहे. सचिन तेंडुलकरने या सेंच्युरीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. या सेंच्युरीसह त्यानं लिटल मास्टर सुनील गावसकरांच्या ८१ फर्स्ट क्लास सेंच्युरीजशी बरोबरी केली आहे.

गावसकर यांनी ३४८ मॅचेसमध्ये ८१ सेंच्युरीज झळकावल्या होत्या. तर सचिन तेंडुलकरला ८१ सेंच्युरीज ठोकण्यासाठी केवळ ३०२ मॅचेस खेळाव्या लागल्या. तब्बल २४ वर्षानंतर सचिनने इराणी ट्राफीमध्ये सेंच्युरी झळकावली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी होणाऱ्या निवडीसाठी सचिन झोकात पुनरागमन करेल अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. तर सचिन तेंडुलकरची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे.



First Published: Friday, February 8, 2013, 14:40


comments powered by Disqus