पेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी, Sangakkara hits 9th test double century against Bangladesh

पेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी

पेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी
www.24taas.com, झी मीडिया, चित्तगाँग

श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.

लंच ब्रेकपर्यंत संगकारा २४४ रन्सवर नाबाद खेळत होता. ब्रेकनंतर त्यानं अजंथा मेंडिससोबत (३२ रन्स) पुन्हा खेळायला सुरूवात केलीय.

या सामन्यात बांग्लादेशचा कॅप्टन आणि विकेटकीपर मुशफिकर रहिम याच्या बोटांना झालेल्या इजेमुळे उणीव भासतेय. तर अब्दुर रझाक हादेखील दुखापतीमुळे या मॅचमध्ये बॉलिंगपासून दूर राहिलाय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 13:00


comments powered by Disqus