Last Updated: Monday, March 17, 2014, 12:26
www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलंबोश्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.
कुमार संगकाराचा हा पाचवा टी-२० वर्ल्डकप आहे. ३६ वर्षीय संगकारा टी-२०मधून निवृत्त होणार असला तरी तो टेस्ट मॅच आणि आयपीएलमध्ये खेळणार आहे. संगकारानं आतापर्यंत श्रीलंकेकडून ५० ट्वेण्टी- २० मॅचेसमध्ये खेळला आहे. त्यानं आतापर्यंत १३११ रन्स जमा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२० होता.
संगकारा २००९च्या ट्वेण्टी-२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन होता. त्यानंतर २०१२मध्ये आपल्या टीमला २०१२च्या वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं. मात्र दोन्ही वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 12:26