दिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?, Sehwag, Delhi Daredevils from dacu?

दिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?

दिल्ली डेअरडेव्हिल्समधून सेहवागला डच्चू?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सातत्याने क्रिकेटच्या मैदानात अपयशी ठरलेला वीरेंद्र सेहवाग हा आयपीएलच्या सहाव्या पर्वात खराब कामगिरीमुळे तो आता दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातूनही डचू बसण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघात वारंवार खराब कामगिरी केल्यामुळे संघाबाहेर फेकल्या गेलेल्या वीरेंद्र सेहवागला आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या पर्वात याचा प्रभाव जाणवणार आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सेहवाग हा दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघात महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्थान भूषवत आहे. मात्र आता दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ वीरेंद्र सेहवागला आपल्या संघात कायम ठेवण्याची शक्यता कमी दिसत आहे.

या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या आठ फ्रेंचायझींना १० जानेवारीपर्यंत आपल्या राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. याशिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा गुणवान डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉक आणि वेगवान शतक झळकावणारा न्यूझीलंडचा फलंदाज कोरी अँडरसन यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

वीरेंद्र सेहवागने मागील आयपीएल हंगामातील १३ डावांमध्ये सेहवागला १९.५०च्या सरासरीने २३४ धावा करता आल्या होत्या. दिल्ली डेअरडेव्हिसचा संघ सेहवागऐवजी डेव्हिड वॉर्नरला संघात कायम ठेवण्याची चिन्हे आहे. असे आयपीएलच्या सूत्रांकडून समजते.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतकांची हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या क्विंटन डी कॉकला आयपीएलच्या लिलावामध्ये चांगली भाव मिळू शकतो. फलंदाजीप्रमाणेच यष्टीरक्षणाची जबाबदारीही तो चांगल्या प्रकारे हाताळतो. तसेच फक्त ३६ चेंडूंत शतक साजरे करणाऱ्या कोरी अँडरसनलाही मागणी आहे. मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ डी कॉकला खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 15:04


comments powered by Disqus