Last Updated: Thursday, April 17, 2014, 15:33
www.24taas.com, झी मीडिया, अबुधाबीबॉलिवूडचा बादशहा शाहरूखनं भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहलीकडून त्याच्या मनातली खरी बाब उघडकीस आणली. लग्नासाठी अनुष्काचं नाव समोर येताच विराट जो काही लाजला... ते सर्वांनीच पाहिलं. आयपीएल 7च्या उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खाननं विराटचं स्वयंवरच उरकलं.
`आयपीएल ७च्या` उद्घाटन सोहळ्याला शाहरुख आणि दीपिका पादुकोण यासारखे सेलिब्रिटीज मनोरंजन करत होते. या कार्यक्रमात शाहरुखनं विराटचं स्वयंवर घडवून आणलं. मंचावर उपस्थित असलेल्या शाहरुखने विराट कोहलीला मंचावर बोलवलं आणि घोषणा केली की, आज जगातील सर्वात उत्तम क्रिकेटरचं स्वयंवर करण्यात येणार आहे.
पहिला शाहरुखने विराटला विचारलं की त्याला लग्नासाठी कशी मुलगी आवडेल. विराटनं यावर उत्तर दिलं की, त्या मुलीचे केस हे घनदाट असले पाहिजे. तसेच ती माझ्या आई-वडिलांची सेवा करणारी असावी. पण यावेळी विराटने कोणाचं नाव घेतलं नाही.
शाहरुखने यानंतर मंचावर साधारण १२ मुलींना बोलवलं. सगळ्यांच्या हातात वेगवेगळ्या मुलींचं चित्र होतं. मग या चित्रातील एका मुलीसोबत विराट लग्न करेल, असं शाहरुखने सांगितलं. हसत-खेळत शाहरुखनं विराटला काही चित्र दाखवले. शेवटी विराटला एक फोटो दाखवला, हा फोटो पाहून विराट पण लाजला. हा फोटो अॅक्ट्रेस अनुष्का शर्माचा होता. फोटो पाहताच विराटची बोलतीच बंद झाली. पण उपस्थित लोकांनी मात्र या गोष्टींची खूपच मजा घेतली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 17, 2014, 15:31