शरद पवार एमसीएचे`किंग` होणार की `किंगमेकर`, Sharad pawar MCA king or king maker

शरद पवार एमसीएचे`किंग` होणार की `किंगमेकर`

शरद पवार एमसीएचे`किंग` होणार की `किंगमेकर`
www.24taas.com, मुंबई

मुंबई क्रिकेट एसोसिएशनच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. मुंबईत झालेल्या 79व्या ऍन्यूएल मीटिंगमध्ये एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार जातीने हजर होते.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनीही या मीटिंगला उपस्थिती लावली होती. यामुळेच एमसीएच्या निवडणुकीच्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय या र्चेचेने जोर पकडलाय. याशिवाय माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित भाजपा नेते आशीष शेलार या सा-यांची उपस्थिती आगामी निवडणुकीची चाहूल देणारी ठरली.

मागील निवडणुकीत तांत्रिक बाबींमुळे निवडणूक लढऊ न शकलेले शरद पवार यावेळी निवडणुक लढवून `किंग` बनतात की `किंगमेकर`ची भूमिका वठवतात याकेडच आता सा-यांच लक्ष लाहून राहिलय.

First Published: Sunday, March 24, 2013, 00:13


comments powered by Disqus