Last Updated: Tuesday, September 3, 2013, 09:32
जळगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसलं तरी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला सर्वात जास्त ३३ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेनंही जोरदार मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळ सत्ता स्थापनेसाठी जैन आणि मनसे एकत्र येणार की मनसे-भाजप-राष्ट्रवादीचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात येणार याबाबत उत्सुकता आहे.