Last Updated: Tuesday, July 9, 2013, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दोन झेल सोडल्यानंतर रवींद्र जडेजा सुरेश रैनाच्या अंगावर धावून आला होता. त्यामुळे भारतीय संघाची इज्जत वेशीला टाकली गेली होती. या प्रकाराचे गंभीर दखळ बीसीसीआयने घेतल्यानंतर पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे रवींद्र जडेजा आणि सुरेश रैनाने म्हटले आहे.
संघाचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांच्याशी जडेजा आणि रैनाने चर्चा केली. दोघांनाही यावेळी समज देण्यात आली. पुन्हा आमच्याकडून अशा प्रकारचे वर्तन होणार नाही, असे दोघांनीही आश्वासन दिले असल्याचे बीसीसीआय`च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दोघांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. संघाच्या व्यवस्थपकाच्या अहवालानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी प्रसारमाध्यमांना सोमवारी सांगितले होते.
#
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.#
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 9, 2013, 16:22