`आयपीएल`मध्ये रैना करणार `सामन्यांचं शतक` पूर्ण suresh Raina wil play hundred IPL match

`आयपीएल`मध्ये रैना करणार `सामन्यांचं शतक` पूर्ण

`आयपीएल`मध्ये रैना करणार `सामन्यांचं शतक` पूर्ण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

१६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सातव्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना एक नवीन रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता निर्माण झालीय. येणाऱ्या आयपीएलमध्ये सुरेश रैनाला मॅचेसची सेंचुरी आणि तीन हजार धावा पूर्ण करण्याची चांगलीच संधी मिळणार आहे.

रैना आयपीएलच्या पहिल्या पर्वापासूनच चेन्नई सुपर किंग्ज संघातर्फे खेळत आहे. या आयपीएलमध्येही रैना चेन्नई सुपर किंग्समधूनच खेळताना दिसेल.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जतर्फे सुरेश रैनाने ९९ मॅचेस खेळल्या आहेत. ९९ मॅचेस मध्ये रैनाने ३५.०२ च्या सरासरीने २,८०२ धावा पूर्ण केल्यात. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये रैनानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यांचा नंबर लागतो. या दोघांनी अनुक्रमे २,५१४ आणि २,५१२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये षट्‌कारांची सेंचुरी पूर्ण करण्याचा विक्रम या तिन्ही फलंदाजांनी केला आहे. यात ख्रिस गेलनं १८०, रैनानं ११५ आणि रोहितनं ११० षट्‌कार मारले आहेत.

येत्या आयपीएलमध्ये १८ एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सुरुवातीचा सामना खेळून सुरेश रैना त्याचे सामन्यांचे शतक साजरं करणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 12:48


comments powered by Disqus