ऑकलंड कसोटीत भारताचा ४० धावांनी पराभव

ऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

ऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
ऑकलंडमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केलं आहे.

ऑकलंड कसोटीत हा भारताचा पहिला पराभव आहे. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी, नंतरच्या फळीच्या फलंदाजांना कायम राखता आली नसल्याने टीम इंडियाचा पराभव झाला आहे.

अखेर टीम इंडिया ३६६ धावांवर ऑल आऊट झाली आणि न्यूझीलंडने आपला ऑकलंड कसोटीतला पहिला विजय साजरा केला.

शिखर धवनने शानदार ११५ धावा केल्या आहेत. धवननंतर रोहित शर्माही बाद झाला आहे. रोहित शर्माने १९ धावा केल्या.

शिखर धवनच्या धावांमुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र नंतरचे फलंदाज झटपट बाद झाल्याने, टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवून घेण्याची वेळ आली.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 9, 2014, 10:05


comments powered by Disqus