इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवानाTeam India DEPARTURE FOR ENGLAND TOUR FROM THE MUMBAI Internatio

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

आपल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडिया इंग्लड सोबत पाच टेस्ट, पाच वन डे आणि एक ट्वेण्टी-20 मॅच खेळणार आहे. 9 जुलै ते 7 सप्टेंबरपर्यंतचा हा दौरा आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात २६ जूनपासून लिसेस्टर विरुद्धच्या तीन दिवसांच्या प्रॅक्टिस मॅचनं होईल. या मॅचनंतर भारतीय टीम एक ते तीन जुलै दरम्यान डर्बीशायर विरुद्ध प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे.

2011 साली टीम इंडियाला इंग्लंडमध्ये 0-4नं त्यानंतर 2012-13 साली मायदेशात इंग्लंडकडून 1-2नं टेस्ट सीरिजमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं धोनीसाठी हा दौरा म्हणजे प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

वेळापत्रक: कशा असतील मॅच

 9 जुलैला ट्रेंटब्रिज इथं भारत-इंग्लंड पहिली टेस्ट मॅच
 17 जुलै लॉर्ड्स इथं दुसरी टेस्ट मॅच
 27 जुलैपासून तिसरी टेस्ट मॅच साऊथमप्टन इथल्या द रोझ बाऊल इथं खेळवली जाईल.
 7 ऑगस्ट चौथी टेस्ट मॅच ओल्ड ट्रॅफर्ड ग्राऊंडवर
 पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच द ओव्हल इथं १५ ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
 पाच टेस्ट मॅचनंतर २५ ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच वन डे आणि एक टी-२० मॅच असे सहा सामने होतील.

कोण आहे टीम इंडियात

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईश्वर पांडे, इशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, वरुण धवन, वृद्धिमान साहा, पंकज सिंह.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 19:53


comments powered by Disqus