इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

Last Updated: Sunday, June 22, 2014, 19:53

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

गौतमचं पुनरागमन; रैनाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा!

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 18:29

बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आलीय. या दौऱ्यात कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय.

अनुष्काला भेटण्यासाठी विराट जोधपूरमध्ये, मध्यरात्रीपर्यंत एकत्र!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 13:53

ढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.

मॅच हरल्यानंतर लपली नाही युवीची 'विराट' निराशा

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 11:22

रविवारी झालेल्या वर्ल्डकप ट्वेन्टी-२० चा फायनल सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेकडून पराभवाचा चांगलाच धक्का बसला.

नेपाळला जमलं ते टीम इंडियाला का नाही?

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 19:49

आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरूवात पराभवाने झाली आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी द्रविड 'नॉट इंट्रेस्टेड'

Last Updated: Saturday, March 15, 2014, 11:18

टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.

टीम इंडिया `फ्लॉप`... कोच डंकन यांना समन्स

Last Updated: Friday, March 14, 2014, 12:20

कोच डंकन फ्लेचर यांनी जेव्हापासून टीम इंडियाची धुरा आपल्या हाती घेतलीय तेव्हापासून टीमच्या खेळाचा आलेख उतरताच राहिलाय.

`तो` टीममध्ये असेपर्यंत टीम इंडियाचा पराभव - गावस्कर

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 10:19

भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पराभवावर इशारा दिला आहे.

सर्कशीतल्या प्राण्यांसाठी रोहित शर्मा सरसावला!

Last Updated: Thursday, March 6, 2014, 13:05

चेहऱ्यावर जखम घेऊन आता टीम इंडियाचा बॅट्समन रोहित शर्मा दिसणार आहे. सर्कशीत हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराचा तो विरोध करणार आहे. एका जाहिरातीत रोहित प्राण्यांवरील अत्याचाराचा निषेध करतांना दिसेल.

भारताची अंडर- १९ टीम वर्ल्ड कपमधून बाहेर

Last Updated: Saturday, February 22, 2014, 21:33

डिफेंडिंग चॅम्पियन्स भारताच्या अंडर- १९ टीमला वर्ल्ड कपमध्ये क्वार्टर फायनलमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडनं भारतावर अटीतटीच्या लढतीमध्ये तीन विकेट्सने मात केली.

आशिया कपमधून धोनी बाहेर, विराटच्या खांद्यावर धुरा

Last Updated: Thursday, February 20, 2014, 21:33

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी 'साइड स्ट्रेन'च्या कारणामुळे बांग्लादेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया कपमधून बाहेर पडलाय.

ऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

Last Updated: Sunday, February 9, 2014, 15:13

www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड ऑकलंडमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केलं आहे. कसोटी मालिक न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे. ऑकलंड कसोटीत हा भारताचा पहिला पराभव आहे. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी, नंतरच्या फळीच्या फलंदाजांना कायम राखता आली नसल्याने टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यामुळे किवींना हा सामना सहज जिंकला आहे,

धावांचं `शिखर` उभारून `धवन` परतला

Last Updated: Sunday, February 9, 2014, 10:58

ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शिखर धवनने शानदार ११५ धावा केल्या आहेत. धवननंतर रोहित शर्माही बाद झाला आहे. रोहित शर्माने १९ धावा केल्या.

वेळापत्रक : ... असे असतील २०१४ मध्ये टीम इंडियाचे दौरे!

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:37

२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.

विराट कोहली ठरला `मॅन ऑफ द मॅच`!

Last Updated: Sunday, December 22, 2013, 21:47

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त आहे. टीममध्ये विराट आणि रोहित शर्मा इनफॉर्म बॅट्समन आहेत कोहलीनंही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ‘विराट’ इनिंग्ज खेळत आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला.

सचिन संघात नसल्याचं सत्य पचवावंच लागेल - धोनी

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 08:17

‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय.

धोनीची चूक ‘टीम इंडिया’ला पडली भारी...

Last Updated: Thursday, December 12, 2013, 16:54

सलग सहा वन-डे सीरिज जिंकत धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. त्यामुळे माहीच्या टीमला या सीरिजमध्ये विजयाची पसंती देण्यात आली होती.

टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला विवाहबद्ध, कार्तिकचा वाङनिश्चय

Last Updated: Saturday, November 30, 2013, 15:09

टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला लग्नाच्या बेडित अडकला. मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी त्यांने सात फेरे घेतले. तर दिनेश कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला.

टीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!

Last Updated: Thursday, November 14, 2013, 22:35

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान बॅट्समन सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ आपल्या पारंपरिक गणवेशाला फाटा देत चक्क सचिन रमेश तेंडुलकर २०० वी टेस्ट असं छापलेली जर्सी तयार केली आहे.

टीम इंडियात कमी तिथे `शमी`!

Last Updated: Thursday, October 24, 2013, 21:08

पावसात वाहून गेलेल्या रांची वन-डेमुळे टीम इंडियाचं नंबर वन स्थान अबाधित राहिलं असलं. तरी टीम इंडियासाठी रांची वन-डेत आणखी एक चांगली बातमी मिळाली ती मोहम्मद शमीच्या रूपात...

धोनीनं सुरू केली ‘2015 वर्ल्डकप’ची तयारी!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 14:35

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं आता 2015च्या वर्ल्डकपची तयारी सुरू केलीय. ‘व्हिजन 2015’ डोळ्यासमोर ठेवून धोनी टीममध्ये आतापासूनच काही बदल करतोय.

स्कोअरकार्ड- पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया

Last Updated: Thursday, October 10, 2013, 22:48

पहिला सामना : भारत X ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी युवराजचं कमबॅक!

Last Updated: Monday, September 30, 2013, 14:08

चेन्नई इथं आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. युवराज सिंगने टीममध्ये कमबॅक केलं आहे. वेस्ट इंडिजच्या `ए` टीम विरुद्ध आणि चॅलेंजर ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याला टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.

टीम इंडिया बनली झिम्बाब्वेची गुरू

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 19:39

भारतीय टीमला ऐतिहासिक विजय मिळवून देणार कोहली आता कोच बनलाय. विराटनं झिम्बाब्वेच्या टीमला कोणता गुरुमंत्र दिला आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.

टीम इंडियाचा नवा मंत्र, टेन्शन नही लेनेका...

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 19:03

प्रत्येक विजयानंतर जल्लोष साजरा करणा-या टीम इंडियाने आता केवळ एकच गुरूमंत्र अंगिकारला आहे... आणि तो म्हणजे `टेन्शन लेनेका नही... टेन्शन देनेका...`

टीम इंडियाचा झिम्बाम्ब्वेवर ऐतिहासिक विजय

Last Updated: Saturday, August 3, 2013, 18:46

पाचव्या आणि अखेरच्या वन-डेमध्ये टीम इंडियानं झिम्बाब्वेवर मात करत पाच वन-डे मॅचेसची सीरिज 5-0 ने जिंकली. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पहिल्या विजयाची नोंद केली.

टीम इंडियाचा दणदणीत विजय

Last Updated: Thursday, August 1, 2013, 19:16

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या वन-डेमध्ये 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय.

झिम्बाब्वे X भारत स्कोअरकार्ड

Last Updated: Thursday, August 1, 2013, 18:27

झिम्बाब्वे विरूध्द भारत यांच्यातील चौथा क्रिकेट सामना सुरू झालाय.

टीम इंडियाचं मिशन २०१५ सुरू

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 22:21

2011 वर्ल्ड कप विजेती टीम इंडियाही मिशन 2015च्या तयारीला लागली आहे... ब्लू ब्रिगेडचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड चॅम्पियनशीप कायम राखण्यासाठी सज्ज असल्याचं मत व्यक्त केलं...

टीम इंडियाचा झिम्बाम्वेवर विजय

Last Updated: Sunday, July 28, 2013, 19:20

झिम्बाब्वेला तिस-या वन-डेमध्ये पराभूत करत विराट कोहलीच्या युवा ब्रिगेडनं पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये बाजी मारली. या विजयासह भारतानं सीरिजमध्ये 3-0 नं विजयी आघाडी घेतली.

टीम इंडियाला `तो` सामना खेळायचाच नव्हता, पण...

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 16:11

टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी घशात घातली, मात्र, शेवटी २०-२० ओव्हर्सचा झालेला हा अंतिम सामना टीम इंडियाला खेळायचाच नव्हता, असा खुलासा आता झालाय.

ट्राय सीरिज : टीम इंडिया विंडिजला दणका देणार?

Last Updated: Sunday, June 30, 2013, 14:12

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया आज लढणार आहे वेस्ट इंडिजशी. श्रीलंकेला धूळ चारल्यानंतर आता कॅरेबियनही टीम इंडियाशी मुकाबला करायला सज्ज झालेत.

कॅरेबियन भूमी गाजवण्यास टीम इंडिया सज्ज

Last Updated: Thursday, June 27, 2013, 12:22

इंग्लंडमध्ये विजयाचा डंका वाजवल्यानंतर आता आव्हान असणार आहे ते `ट्राय सिरीज`मध्ये कॅरेबियन भूमी गाजवण्याचं.

भारतीय खेळाडू गाढवाचे हरीण झालेत!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 21:16

टीम इंडियांचे तारे सध्या चमकत असले तरी टीम इंडियाची ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. इंग्लडचा माजी कर्णधार माइक आथर्टन याने कॉमेंट्री करताना भारतीय क्षेत्ररक्षक गाढवांचे हरीणं कशी झाली अशी संतापजनक टीप्पणी केली आहे.

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 08:15

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधील आपल स्थान निश्चित केलय. शिखर धवन आणि रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा विजायाचे शिल्पकार ठरले. धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद सेंच्युरी झळकावली.

टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर...

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 15:54

भारताला आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, इंग्लडने ऑकलंडमध्ये आज न्यूझीलंड सोबत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला ड्रॉ करण्यात यश मिळालं आहे.

घरच्या मैदानावर धवन खेळाला मुकणार?

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 11:20

टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवननं मोहालीत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मोहालीवर कब्जा करता आला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ मार्च रोजी होणाऱ्या आपल्या घरच्या मैदानावर मात्र शिखर धवन खेळणार नसल्याचं चित्र दिसतंय.

दोन टेस्टसाठी आज निवड, सेहवागचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 11:31

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. सध्या खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या भवितव्याबाबत निवड समिती काय निर्णय घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

ऑस्ट्रेलिया टीमचा हैदराबादला न जाण्याचा निर्णय

Last Updated: Thursday, February 21, 2013, 22:19

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये उद्या शुक्रवारीपासून क्रिकेट कसोटी सामने सुरू होत आहेत. उद्या चेन्नईत सामना होत आहे. मात्र, २ मार्च रोजी होणाऱ्या हैदराबादमधील कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियाने हैदराबादला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

‘बीसीसीआय’ची टीम इंडियाला तंबी...

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 10:53

ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना प्रसार माध्यमांशी बोलण्यास बीसीसीआयनं बंदी घातलीय.

धोनीच्या घरी टीम इंडियाची पार्टी

Last Updated: Thursday, January 17, 2013, 17:19

टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकून भारत-इंग्लंडच्या या सीरिजमध्ये बरोबरी साधल्याने क्रिकेटरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टीम इंडियाचं काय होणार?

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:14

टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे.

कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी होणार?

Last Updated: Monday, January 14, 2013, 19:36

वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

धोनीने टी-२० कर्णधारपद सोडावे-द्रविड

Last Updated: Friday, January 11, 2013, 12:41

मायदेशातील मालिकापराभवांमुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका होत असली तरी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने धोनीची पाठराखण केली आहे.

धोनीने केला सेहवागचा पत्ता कट?

Last Updated: Monday, January 7, 2013, 19:32

इंग्लडविरुद्ध होणाऱ्या वन डे सिरिजमधून धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याने निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

इंग्लंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा

Last Updated: Sunday, January 6, 2013, 21:20

इंग्लंडविरुद्धच्या तीन वन-डे मॅचेसाठी टीम इंडियाची दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली. वीरेंद्र सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये त्याला काही केल्या फॉर्म गवसत नसल्यानेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

पहा नव्या वर्षात टीम इंडिया खेळणार तरी किती?

Last Updated: Thursday, January 3, 2013, 17:17

पहा नव्या वर्षात भारतीय क्रिकेट टीमचा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना भारताच्या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.

भारताचा खुर्दा

Last Updated: Thursday, January 3, 2013, 20:04

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवरील दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने ८६ धावांनी गमावला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी गमावली आहे. तब्बल ७ वर्षांनी भारताला मायभूमीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.

भारत पराभवाचा बदला घेणार ?

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:27

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणावर टी-20ची लढत रंगणार आहे. टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर असेल तर दुसरीकडे पहिल्या टी-20त विजय मिळवल्याने पाकिस्तान टीमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आता या निर्णायक लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.

सचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही

Last Updated: Thursday, December 27, 2012, 15:28

सध्या मसुरीला असलेल्या सचिनला चिअरअप करण्यासाठी टीम इंडियानं भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये त्याला हसवण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल पोस्टर्स झळकावले.

भारत-पाक मालिका - टीम इंडियाची घोषणा

Last Updated: Sunday, December 23, 2012, 12:41

भारतात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आलीय. वन-डे संघात बदल करण्यात आलाय. तर ट्वेंटी-२० संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही.

द्रविडने काढले टीम इंडियाचे वाभाडे

Last Updated: Monday, December 10, 2012, 19:21

कोलकाता कसोटीमध्ये पानिपत झालेल्या भारतीय संघातील खेळाडुंच्या कौशल्याबद्दल आणि क्षमतेबद्दल भारताचा माजी कसोटीवीर राहुल द्रविडने टीम इंडियातील खेळाडूंचे वाभाडे काढले आहे.

कूक ठरतोय धोकादायक

Last Updated: Thursday, December 6, 2012, 21:04

ऍलिस्टर कूक टीम इंडियासाठी या सीरिजमध्ये चांगलाच धोकादायक ठरतोय. या सीरिजमध्ये तिन्ही टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावत भारताच्या अडचणी चांगल्य़ाच वाढवल्यात.

सध्या टीम इंडियाला सचिनची जास्त गरज - द्रविड

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 15:48

खराब फॉर्मच्या चक्रव्युहात अडकलेल्या सचिनवर निवृत्तीसाठी दबाव दिसून येतोय. पण भारतीय टीमची वॉल असलेल्या राहुल द्रविडला मात्र तसं वाटत नाही. राहुलच्या मते, टीम इंडियाल आत्ता खरी सिनीअर खेळाडूची गरज आहे.

टीम इंडियात सलामीला कोण?

Last Updated: Sunday, November 4, 2012, 19:08

भारतीय टीमला सध्या सलामीच्या जोडीचा प्रश्न चांगलाच सतावतोय. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागला अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत युवा क्रिकेटपटूंनी सिलेक्शन कमिटीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यश मिळवलंय. आता य़ुवा क्रिकेटपटूंमध्ये कोणाची वर्णी टीम इंडियात लागते याकडेच सा-यांच लक्ष असेल.

धोनीची ही टीम काहीही कामाची नाहीये- गावसकर

Last Updated: Wednesday, October 31, 2012, 13:51

`भारतीय क्रिकेट टीमच्या सध्याचा फॉर्म पाहता धोनीचा हा संघ गेल्या तीन दशकांतील सर्वात कमकुवत संघ आहे`. अशी तोफ माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी डागली आहे.

भारताचं आव्हान संपलं, वर्ल्डकपमधून घरी रवानगी

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 22:34

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या.

टीम इंडियाच्या मार्गात अनेक काटे!

Last Updated: Monday, October 1, 2012, 18:06

कट्टर प्रतिस्पर्धी पाकला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आणि प्रशंसक खूपच खूष असले तरी टी-२० विश्व चषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताच्या मार्गात अनेक काटे आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

Last Updated: Friday, September 28, 2012, 22:28

भारताने टॉस जिंकून पहिले बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक सुरुवातीनंतर मात्र गंभीरच्या आळशीपणाचा त्याला फटका बसला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली.

‘सुपर-८’साठी टीम इंडिया सज्ज!

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 12:44

श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅचेस जिंकत धडाक्यात सुरूवात केली आहे.

धोनी सुट्टी घेऊन चाललाय तरी कुठे?

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 12:15

टीम इंडियाच्या फॅन्सना सध्या एक प्रश्न सतावतोय की, कॅप्टन धोनी सुट्टीवर का? कसलं सेलिब्रिशन करण्यासाठी माही अँड कंपनी जातेय.

उद्याच्या मॅचसाठी टीम इंडियात बदल?

Last Updated: Saturday, September 22, 2012, 20:19

कॅप्टन धोनीला टीममध्ये काही बदल करण्याची संधी आहे. इंग्लंडविरूद्धच्या मॅचमध्ये टीममध्ये बदल केले जातील असे संकेतही धोनीने दिले आहेत.

टीम इंडियांच खरं नाही, युवराज-रैना पडले आजारी

Last Updated: Saturday, September 22, 2012, 11:26

टी-२० वर्ल्डकप श्रीलंकेत सुरू आहे. मात्र भारतीय टीमचं काहीही खरं नाही. कारण टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच चिंतेत पडला आहे.

टीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?

Last Updated: Friday, September 21, 2012, 18:43

आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.

भारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`

Last Updated: Friday, September 21, 2012, 19:57

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...

सचिनवर दबाव टाकू नका - लारा

Last Updated: Sunday, September 16, 2012, 14:52

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.

‘दादा’ला बनायचंय टीम इंडिया कोच…

Last Updated: Thursday, September 6, 2012, 12:37

भारतीय क्रिकेटचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं आता एक नवीन इच्छा व्यक्त केलीय. ही इच्छा म्हणजे, सौरवला आता भारतीय टीमचा कोच बनायचंय!

टीम इंडियाची इनिंग गडगडली

Last Updated: Sunday, September 2, 2012, 12:06

बंगळुरूच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया संकटात सापडली असताना विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने शतकी पार्टनरशिप करत भारताला तीनशेपारचा आकडा गाठून दिला. मात्र टीम साऊथीच्या भेदक मा-यापुढे भारतीय बॅट्समन्सनी नांगी टाकल्याने, न्यूझीलंडला भारताविरूद्ध 12 रन्सची आघाडी घेण्यात यश आलं.

अंडर-१९ विश्वविजयी टीम विजयी थाटात परतली

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 16:12

या यंग इंडियाचा आज मुंबईत बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता एका कार्यक्रमात विश्वविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट टीमने केली जंगलात प्रॅक्टीस

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 14:05

अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली.

टीम इंडियाचा लूक

Last Updated: Thursday, August 16, 2012, 20:28

सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणा-या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया या नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज मुंबईत टीम इंडियाच्या या नव्या जर्सीच एक कार्यक्रमात अनावरण करण्यात आले.

चौथी वनडे आज... आज लंकादहन होणार?

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 11:25

भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वन-डे कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतानं ही मॅच जिंकली तर सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी धोनी अँड कंपनीसमोर असणार आहे.

लंका दौऱ्यात भारताची विजयी सलामी

Last Updated: Saturday, July 21, 2012, 23:49

टीम इंडियानं लंका दौऱ्याची सुरुवात विजायानं केलीय. भारतानं लंकेला २१ रन्सनं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.

भारताची श्रीलंकेवर २१ रन्सनं मात

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 10:22

भारत आणि श्रीलंका यांच्‍यात वन डे क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्‍या वन डेमध्‍ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ड्रग्स राहुलला भोवणार, दहा वर्ष शिक्षा होणार?

Last Updated: Saturday, July 21, 2012, 10:48

क्रिकेटर राहुल शर्मावर बीसीसीआय कारवाई करण्याची शक्यता आहे. राहुल शर्माला जुहूतील रेव्हपार्टी भोवण्याची शक्यता आहे. राहुल शर्मा सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.

टीम इंडिया सज्ज, लंकादहन करणार?

Last Updated: Saturday, July 21, 2012, 09:53

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया श्रीलंकेला त्यांच्याच मायभुमीत लोळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला- सेहवाग

Last Updated: Friday, July 6, 2012, 16:44

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.

भारतीय हॉकी टीमने ब्राँझ मेडल पटकावलं

Last Updated: Sunday, June 3, 2012, 22:32

भारतीय हॉकी टीमनं अझलन शहा हॉकी टुर्नामेंटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 3-1 नं पराभव करत ब्राँझ मेडलची कमाई केली. मॅचच्या फर्स्ट हाफच्या अखेरच्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनकरता ऍश्ले जॅक्सनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये 1-0ने आघाडी घेतली होती.

टेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन

Last Updated: Saturday, June 2, 2012, 18:54

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला पुन्हा टेस्ट चॅम्पियन बनण्याचे वेध लागले आहेत. भारताच्या दौ-यावर येणा-या इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिज जिंकून, पुन्हा टेस्टमध्ये बेस्ट बनण्याचा मानस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाणा-या टीम इंडियाकडे, टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा एकदा चमकण्याची संधी आहे.

'वर्ल्डकप' विजय 'वर्षपूर्ती'.. इंडियाने काय गमावलं

Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:58

टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल २८ वर्षांनी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती.

भारताचा ऐतिहासिक 'विराट' विजय

Last Updated: Sunday, March 18, 2012, 22:59

एशिया कपच्या बिगफआईटमध्ये पाकिस्ताननं धडाकेबाज सुरुवात केली आहे. मोहम्मद हाफीज आणि नासिर जमशेद या पाकच्या ओपनर्सची हाफ सेंच्युरीही झळकावली आहे.

भारत पाक वनडेला सुरुवात

Last Updated: Monday, March 19, 2012, 07:12

एशिया मालिकेत भारत पाकिस्तान वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा करण्याचा निर्णय घेतला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियात रविंद्र जाडेजा ऐवजी युसूफ पठाणला संधी देण्यात आली आहे.

सचिनचं शतक आणि भारताची हार !

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:37

सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं. पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

द्रविड एकमेवाद्वितीय - सचिन तेंडुलकर

Last Updated: Thursday, March 8, 2012, 20:11

राहुल सारखा दुसरा क्रिकेटर होणार नाही आणि मला त्याची उणीव भासेल, अशा भावना द वॉल राहुल द्रविड क्रिकेटला निरोप देतोय ही बातमी समजताच मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल द्रविड निवृत्तीची घोषणा करणार?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 16:36

द वॉल या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नावाजलेला भारतीय मिडल ऑर्डर बॅट्समन राहुल द्रविड कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मागील वर्षी द्रविडने इंग्लंड दौऱ्यातच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.

टीम इंडिया खालीहात माघारी

Last Updated: Saturday, March 3, 2012, 17:28

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सपाटून मार खाल्लेल्या भारतीय संघाचे आज मायदेशात आगमन होत आहे. (शनिवार) मायदेशाकडे रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघाला एकही मालिका जिंकण्यात यश आले नाही. वनडे मालिकेत अंतिम फेरीआधीच झालेलं ‘ पॅक अप ’ , अशा निराशाजनक कामगिरीनंतर अत्यंत खिन्न मनाने, माना खाली घालून टीम इंडियाच्या वीरांनी आज ऑस्ट्रेलियातून प्रस्थान केलं आहे.

अखेर पूनम पांडे झाली 'टॉपलेस'

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 11:49

'इंटरनेट सेन्सेशन' बनलेल्या पूनम पांडेने गेल्यावर्षी दिलेलं अश्वासन असेर पाळलंच. आफल्या फॅन्ससाठी पूनम पांडेने ट्विटरवर टॉपलेस ट्विटपिक अपलोड केला आहे. पब्लिक डिमांडवरून आपला बिकीनीरहीत टॉपलेस फोटो फोटो अपलोड केला आहे.

आज कुणाचं तिकीट होणार 'कर्न्फम'?

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 08:34

एशिया कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन आज मुंबईत करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियाची खराब कामगिरी पाहता सिलेक्शन कमिटीसमोर टीम इंडियाची निवड करणं आव्हानात्मक असणार आहे.

टीम इंडियाला नव्हतीच खेळायची ‘फायनल’

Last Updated: Friday, March 2, 2012, 17:29

प्रशांत जाधव
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत कांगारूंकडून व्हाइटवॉश मिळाल्यानंतर विश्वविजेती टीम इंडिया वन डेत काही तरी कमाल करून दाखवेल असे वाटत होते. मात्र, वन डेतही माती खात लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे वेध टीम इंडियाला लागेल आहे.

टीम इंडियासाठी आता 'करो या मरो'

Last Updated: Saturday, February 25, 2012, 23:04

सीबी सीरिजची फायनल गाठण्यासाठी भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच जिंकावीच लागणार आहे. टीम मध्ये गटबाजीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.

महिलांनी गमावलं, 'तुम्ही तरी करून दाखवा'

Last Updated: Saturday, February 25, 2012, 22:00

भारतीय पुरुषांनी हॉकी क्वालिफायर टुर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा मुकाबला फ्रान्सशी होणार आहे. लंडनं ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारताला फायनल मॅच जिंकावीच लागणार आहे.

काय आहे टीम इंडियाचं रँकिंग?

Last Updated: Thursday, February 23, 2012, 15:59

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे ११६ पॉईंट्स आहेत. दुसऱ्या स्थानावर कायम राहण्यासाठी भारताला ट्राय सीरिज जिंकावीच लागणार आहे.

'टीम इंडिया'तील वाद 'रोटेशन पॉलिसी'मुळे

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 18:22

टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:11

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

टीम इंडिया जिंकण्यासाठी धडपडतेय...

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 16:29

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत भारताच्या ७ विकेट गेल्या आहेत. गेल्या काही मॅचमध्ये प्रमुख बॅट्समननी साफ निराशाच केली आहे.

लंका 'बॅकफूटवर', इंडियाचं 'गुड वर्क'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 13:19

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वन डे मॅच मध्ये श्रीलंकेने चांगली सुरूवात केली, मात्र भारतीय बॉलरने झोकात पुनरागमन करत श्रीलंकेच्या खेळाडूंना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं आहे.

आव्हान २८८ रनचं, इंडियाची मात्र खराब सुरवात

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

ऑस्ट्रेलियाच्या २८८ आव्हांनाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात खराब झाली आहे. गेल्या दोन मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा गंभीर झटपट बाद झाला.

ऑसींची सावध सुरवात, भारत करणार का मात?

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

भारत वि. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये ऑस्टेलियाने प्रथम बॅटींग करत अगदी सावध सुरवात केली आहे. याआधीच्या भारताविरूद्धच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने ऑसींना लोळवले होते.

इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवणार का?

Last Updated: Monday, February 13, 2012, 19:00

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान असणार आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे.

... आणि टीम इंडियाने अॅडलेड केले काबीज

Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:18

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमधील अॅडलेड येथील तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अटीतटीचा झालेल्या या सामनात विजयाचा शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंह धोनी.