माझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड Test Cricket is my first Love - Rahul Dravid

माझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड

माझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

चॅम्पियन्स लीगमध्ये अखेरची मॅच खेळल्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र ज्या क्रिकेटवर नितांत प्रेम केलं, त्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मी अधिक भावनाविवश झालो, असं मत व्यक्त करत द्रविड म्हणाला की, टेस्ट क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे.

मुंबई इंडियन्सकडून चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये पराभूत व्हावं लागल्यानंतर द्रविड अधिक भावनाविवश झाला होता. तो म्हणाला, ``राजस्थान संघाला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. राजस्थानसारख्या युवा संघाचं नेतृत्व करायला मिळालं, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण होता. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानं हादरलेल्या संघाचं कर्णधारपद सांभाळताना आणि त्या वातावरणात कामगिरी उंचावतानाचा अनुभव फारच विलक्षण होता. क्रिकेटमध्ये स्पॉट-फिक्सिंगसारखं प्रकरण घडायला नको होतं. त्याचा उल्लेखही या क्षणी करण्याची इच्छा नाही. पण त्या खडतर परिस्थितीतून आम्ही मार्ग काढला.`

दरम्यान, चॅम्पियन्स लीगच्या फायनलपूर्वी त्यापूर्वी दोन्ही संघातील शिलेदारांनी सचिन आणि राजस्थानचा ‘रॉयल’ राहुल द्रविडला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. फिल्डिंगच्या निर्णयानंतर द्रविड मैदानावर आला, तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी त्याला सलामी दिली. आऊट झाल्यानंतर हेल्मेट काढून द्रविडनं चाहत्यांना अभिवादन केलं. तर चाहत्यांनीही उभं त्याला अभिवादन केलं.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013, 15:11


comments powered by Disqus