पॉमर्सबॅचची टीममधून हकालपट्टी - Marathi News 24taas.com

पॉमर्सबॅचची टीममधून हकालपट्टी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅच याच्यावर त्याच्या टीमनंही कारवाईची भूमिका घेतलीय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे मालक विजय माल्या यांनी पॉमर्सबॅचवर टीमकडून बंदी घालण्यात आली आहे, असं नुकतंच जाहीर केलंय.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याचा आरोप आहे.  पोलिसांमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीनूसार एका हॉटेलमध्ये झालेल्या आरसीबीच्या पार्टीत ही विदेशी महिला जेवत असताना ल्युकने महिलेला आणि महिलेच्या बॉयफ्रेंडला मारहाण केली होती. याप्रकरणात पोलिसांनी पॉमर्सबॅचला अटकही केलीय.
 
दरम्यान, बीसीसीआयनं याबाबत आपली जबाबदारी झटकली आहे. या प्रकरणासाठी आयपीएल जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी दिली आहे.

First Published: Friday, May 18, 2012, 12:54


comments powered by Disqus