मल्ल्यांच्या टीमकडून जीवे मारण्याची धमकी

Last Updated: Friday, May 18, 2012, 15:15

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी बंगळुरूचा संघ दबाव टाकत असल्याचे अमेरिकन महिलेने सांगितले आहे. असे केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप या अमेरिकन महिलेने केला आहे.

पॉमर्सबॅचची टीममधून हकालपट्टी

Last Updated: Friday, May 18, 2012, 12:54

महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅच याच्यावर त्याच्या टीमनंही कारवाईची भूमिका घेतलीय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे मालक विजय माल्या यांनी पॉमर्सबॅचवर टीमकडून बंदी घालण्यात आली आहे, असं नुकतंच जाहीर केलंय.

माल्यांचा 'किंगफिशर एअरलाइन्स'ला 'टाटा'?

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 17:21

‘किंगफिशर’ला वाचवण्यासाठी विजय माल्या टाटा समूहाबरोबर चर्चा करत आहेत. झी २४ तासला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार याबाबत विजय माल्या यांनी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली आहे.