Last Updated: Saturday, May 19, 2012, 11:24
www.24taas.com, नवी दिल्ली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पॉमर्सबॅचला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार आहे. यापूर्वी त्याला अटक करण्यात आलं होतं आणि जामिनही मंजूर झाला होता. ल्यूकवर एका अमेरकन महिलेची छेडछाड केल्याचा आरोप आहे.
राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात थांबलेल्या या महिलेने व तिच्या भावी पतीने बंगळुरुचा खेळाडू ल्यूक पॉमर्सबॅच याला आपल्या खोलीत बोलावले होते. त्यानंतर महिलेने आरोप केला आहे की, या खेळाडूने माझ्याशी गैरवर्तन करुन अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. याला जेव्हा माझ्या भावी पतीने विरोध केला तेव्हा त्या खेळाडूने त्यालाही मारहाण केली. तक्रार करणारी महिला आणि तिचा भावी पती यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचे या महिलेने म्हटले होते.
ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची केल्याचा तक्रार दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.विकेटकीपर असणा-या पॉमर्सबॅचने आयपीएलमध्ये याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
First Published: Saturday, May 19, 2012, 11:24