सचिन-स्मिथ जोडीनं राजस्थानला केलं गारद - Marathi News 24taas.com

सचिन-स्मिथ जोडीनं राजस्थानला केलं गारद

www.24taas.com, जयपूर
 
आयपीएलमध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स एकमेकांच्या समोर आले. राजस्थानच्या पूर्ण टीमला मुंबईच्या फक्त सचिन आणि स्मिथनंच पाणी मागायला लावलं... १६३ रन्सचं आव्हान राजस्थाननं मुंबईसमोर ठेवलं होतं. सचिननं नाबाद ५८ तर ड्वेन स्मिथनं नाबाद ८३ रन्स काढत राजस्थानला धूळ चारली. आणि १० गडी राखून मुंबईनं राजस्थानवर विजय मिळवला. मुंबईच्या धवल कुलकर्णीनं यातील ३ विकेट्स घेतल्या. हा आयपीएलमध्ये लीग सामन्यांमध्ये शेवटचा सामना ठरला.
 
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन राहुल द्रवीडनं टॉस जिंकत सुरुवातीला बॅटींगचा निर्णय घेतला होता. त्यांनी मुंबईपुढे १६२ रन्सचं आव्हान ठेवलं. राजस्थानच्या शेन वॉटसनने सर्वाधिक ४५ रन्स काढले. द्रविडनं ५ रन्स, बिन्नीनं २० रन्स, अजिंक्य राहाणेनं १३ रन्स, अशोक मनेरियानं २१ रन्स तर ओवेस शहानं नाबाद २८ रन्स दिले. याला प्रत्युत्तर देताना स्मिथनं ५८ बॉल्समध्ये १० फोर आणि ३ सिक्स ठोकून ८७ रन्स दिले. तर सचिननं ५१ बॉल्समध्ये ६ फोर ठोकत नाबाद ५८ रन्स काढले. यावेळी राजस्थानच्या बॉलर्सची अवस्था दयनीय झाली होती.
 
यामुळे पॉईंट टेबलमध्ये मुंबई तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. आता सेमीफायनलमध्ये बुधवारी मुंबईची गाठ चेन्नईबरोबर पडणार आहे.

First Published: Monday, May 21, 2012, 00:00


comments powered by Disqus