उद्याचा सचिन! - Marathi News 24taas.com

उद्याचा सचिन!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
उद्याचा सचिन आणि चॅम्पियन्सची नाव घेत असताना मास्टर-ब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच नावही आपसूकच येत. अर्जुनही आपल्या वडिलांप्रमाणेच एक बॅट्समन आहे. मात्र सध्या तो बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करत आहे. हॅरिस शिल्ड या शालेय टुर्नामेंटमध्ये अर्जुन आपली गुणवत्ता सिध्द करण्यात मग्न आहे. बारा वर्षांच्या अर्जुनवरील आशा आणि अपेक्षांच ओझं खुपच मोठं आहे.
 
'सचिन रमेश तेंडुलकर' या नावाने आपल्यामध्ये सारं क्रिकेट विश्वचं सामावून घेतल आहे. सचिनचं व्यक्तिमत्त्वच त्याच्या रेकॉर्डस सांगतात. हे नाव ऐकताच क्रिकेट फॅन्समध्ये एक प्रकारची नवी आशा निर्माण होते. फॅन्स सचिनकडून एवढ्या आशा ठेवतात. तर मग ज्युनिअर सचिनकडून फॅन्सच्या थोड्याफार आशा असणंही तेवढच स्वाभाविक आहे. अर्जुन सचिन तेंडुलकरची जशी-जशी पावलं ग्राऊंडवर पडतात तशी-तशी क्रिकेट फॅन्सच्या आशा पल्लवीत होत जातात. त्यानं काढलेला प्रत्येक रन एकच आशा निर्माण करतोय ती  उद्याचा सचिनची. त्याने घेतलेली प्रत्येक विकेट ही तो सचिनपेक्षा मोठा क्रिकेटपटू होणार ही आशा निर्माण करते.
 
अर्जुनलादेखील या अपेक्षेची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच तो ग्राऊंडवर प्रत्येक पाऊल हे जपून टाकतो. आपल्या वडिलांप्रमाणे तोदेखील कित्येक तास ग्राऊंडवर प्रॅक्टीस करतो. अर्जुननेदेखील आपल्या वडिंलांप्रमाणे मुंबईत 'हॅरिस शिल्ड टूर्नामेंट'मध्ये चांगली कामगिरी करून आपल्यातील गुणवत्ता सिध्द केली. २३ वर्षांपूर्वी सचिनने विनोद कांबळीबरोबर ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशिप केली होती. तर अर्जुननेदेखील याच टूर्नामेंटमध्ये २२ रन्स देत ८ विकेट्स घेतल्या. केवळ बॉलिंगमध्येच नाही तर अर्जुनच्या बॅटिंगमध्येही फॅन्सला सचिनची झलक दिसते. फरक एवढाच आहे की सचिन उजव्या हाताने बॅटिंग करतो तर अर्जुन डाव्या हाताने. मात्र सचिन डाव्या हाताने लिहतो यातदेखील फॅन्सला साम्य वाटतं. अर्जुनचा क्रिकेटमधील गुणवत्ता पाहता इतिहासालाही कदाचित अजून एक सचिन बनताना पाहणंच आवडत असावं

First Published: Thursday, December 15, 2011, 16:29


comments powered by Disqus