श्रीलंका पराभवाच्या छायेत - Marathi News 24taas.com

श्रीलंका पराभवाच्या छायेत

www.24taas.com, पल्लेकल
 
भारताने श्रीलंकेपुढे २९५ धावांचे टार्गेट ठेवलेले असताना या टार्गेटचा पाठलाग करताना लंकेचे पाच गडी १२५ धावांवर बाद झाले आहेत. २०  षटकात लंकेने १२५ धावा  केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा पराभव निश्चित समजला जात आहे.
 
थिरीमने आणि मेंडिस मैदानावर आहेत.   इरफान पठाणने दिलशानला शुन्यावर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर थरंगा ३१ धावाकाढून इरफानच्या गोलंदाजीवर मनोज तिवारीकडे झेल देत बाद झाला.
 
भारताने ५० षटकात ७  बाद २९४ धावा केल्या आहेत. इरफान पठाण (२९) आणि आर. आश्विन (२) नाबाद राहिले.  कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३८  चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. लसिथ मलिंगाने मनोज तिवारी (६५) व सुरेश रैना (०) यांना बाद करुन भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर सेनानायकेने सलामीवीर गौतम गंभीरचा (८८) अडसर दूर केला. त्याआधी श्रीलंकेच्या एन. प्रदीपने दोन गडी बाद केले.

First Published: Saturday, August 4, 2012, 22:05


comments powered by Disqus