ईशांत अनफिट, फिटनेसची किटकीट - Marathi News 24taas.com

ईशांत अनफिट, फिटनेसची किटकीट

झी २४ तास वेब टीम, कॅनबेरा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापतींची चिंता सतावतेय. फास्ट बॉलर ईशांत शर्माला घोटाची दुखापत झाली आहे. त्याला दुखापतीमुळे दुस-या प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळता आलं नाही. त्याला दुखापत झाल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
 
प्रॅक्टिस मॅचपूर्वी तो टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनला उपस्थित होता. मात्र त्यानं नेटमध्ये बॉलिंग प्रॅक्टिस केली नाही. फुटबॉल सेशनमध्येच त्यानं केवळ सहभाग घेतला होता. टीम मॅनेजमेंटनं ईशांत पहिल्या टेस्टपर्यंत फिट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.  त्याची फिटनेस टेस्ट मंगळवारी होणार आहे. त्यानंतरच त्याच्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ईशांतला घोटाच्या दुखापतीमुळे पहिली प्रॅक्टिस मॅच अर्धवट सोडून मैदानाबाहेर परताव लागलं होतं
 
ईशांतला पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये केवळ 5.3 ओव्हर्सच बॉलिंग केली. आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यावेपासूनच त्याच्या दुखापतीची चिंता टीम इंडियाला सतावून लागली होती.
 
ऑस्ट्रेलिया दौ-याची भारताची सुरुवातही इंग्लंड दौ-यासारखीच दुखापतींनी झाली आहे. इंग्लंडमधून दुखापतीमुळे तब्बल आठ क्रिकेटपटू मायदेशी परतले होते. आणि ईशांतनं टीम इंडियासाठी दुखपतींच्या मालिकेला सुरुवात करुन दिली आहे. दुखापतींचा हा सिलसिला थांबवण्याच आव्हान भारतीय टीमसमोर असणार आहे. दरम्यान, ईशांत पहिल्या टेस्टपर्यंत फिट होईल आणि टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.

 

First Published: Monday, December 19, 2011, 16:15


comments powered by Disqus