वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड

Last Updated: Thursday, October 31, 2013, 11:28

सचिनच्या निरोपाच्या मॅचसाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. म्हणजेच वेस्ट इंडीज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया आज निवडली जाईल. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत संदीप पाटील आणि कंपनीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो बॉलर्सचाच.

… आणि कॅप्टन कूल बॉलर्सवर भडकतो तेव्हा!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 13:41

कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.

धोनीनं कमावलं, ईशांतनं गमावलं!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 08:42

बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळं तिसऱ्या मोहाली वन-डेमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला. धोनीची सेंच्युरी आणि कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं कांगारुंसमोर ३०४ रन्सचं आव्हान उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर्स कांगारुंच्या बॅट्समनला वेसण घालण्यात अपयशी ठरले. यामुळंच टीम इंडियाला तिसऱ्या वन-डेमध्ये ४ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली.

कामरान अकमल नडला, ईशांत शर्मा भिडला

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:02

पहिल्या टी-२० मॅचमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली. या मॅचमध्येही भारत-पाकिस्तान मधली टशन दिसून आली. टीम इंडियाचा ईशांत आणि पाकिस्तानचा कामराननं एकमेकांना खुन्नस दिली.

ईशांत शर्मा आयपीएलमधून आऊट

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:22

भारतीय फास्ट बॉलर ईशांत शर्मा घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या घोट्याच्या दुखातीवर या महिन्याच्या अखेरीस शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

ईशातंच बोट दाखवून अवलक्षण

Last Updated: Monday, January 9, 2012, 23:38

भारताचा क्रिकेट दौरा हा भारतीयच्या खराब कामगिरीमुळे चांगलाच गाजतो आहे. मात्र आता हाच दौरा गाजतो आहे तो म्हणजे भारतीय खेळाडूच्यां वर्तणूकीमुळे. भारतीय मीडियानुसार भारताचा फास्ट बॉलर ईशातं शर्माने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट प्रेक्षकांना आपलं बोट दाखवलं आहे.

ईशांत अनफिट, फिटनेसची किटकीट

Last Updated: Monday, December 19, 2011, 16:15

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापतींची चिंता सतावतेय. फास्ट बॉलर ईशांत शर्माला घोटाची दुखापत झाली आहे. त्याला दुखापतीमुळे दुस-या प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळता आलं नाही. त्याला दुखापत झाल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.