मोस्ट अवेटेड सीरीज.. काय होणार? - Marathi News 24taas.com

मोस्ट अवेटेड सीरीज.. काय होणार?

झी २४ तास वेब टीम
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा  कदाचित हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरु शकतो. दोन्ही टीम्स समतोल आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मोस्ट अवेटेड सीरिजला मेलबर्न टेस्टपासून सुरुवात होते आहे.
 
दोन्ही टीम्समधील मॅचेसना आता एखाद्या युद्धाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या दोन्ही टीम्समधील मॅचेस अधिक रंगतदार होत आहेत. दरम्यान, या सीरिजमध्ये भारतीय टीम कांगारुंच्या टीमपेक्षा अधिक अनुभवी आहे. त्यामुळे टीम इंडियाला रोखण्याचं मोठ आव्हान मायकल क्लार्कच्या टीमसमोर असणार आहे. भारताची बॅटिंग मजबूत असली तरी,  बॉलिंग भारताची कमजोरी ठरु शकते. झहीर खान, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यावर फास्ट बॉलिंगची मदार असणार आहे. झहीर आणि ईशांत फिट असल्याच भारतीय टीम मॅनेजमेंटमनचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही बाब भारताच्या पथ्यावरच पडणार आहे. आर. अश्विननं प्रॅक्टिस मॅचमध्ये आपल्या स्पिनची कमाला दाखवली होती. ऑस्ट्रेलियात ऑफ स्पिनर नेहमीच यशसवी ठरतात. त्यामुळे अश्विनकडून टीमला मोठ्या अपेक्षा असतील. बॅटिंगमध्ये वीरेंद्र सहेवाग आणि गौतम गंभीर ही ओपनिंग जोडी निर्णायक भूमिका बजावणार आहे. या दोघांवर टीमला धडाकेबाज सुरुवात करुन देण्याच चॅलेंज असणार आहे.
 
भारताची मिडल ऑर्डर ही जगातील सर्वात अनुभवी मिडल ऑर्डर आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना रोखण युवा कांगारु बॉलर्सना कठीण जाणार आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीलाही आपल्या बॅटिंगची जबाबदारी चोख पार पाडावी लागणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील एकालाच प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे. कोहली-शर्मा जोडीनं प्रॅक्टिस मॅचमध्ये कमाल केली होती. ऑस्ट्रेलियन टीम सध्या फॉर्मसाठी झगडते. युवा जेम्स पॅटिनसननं किवींविरुद्ध दिमाखात टेस्ट क्रिकेटमध्ये एंट्री घेतली होती. भारतीय बॅट्समनसाठी तो धोकादायक ठरु शकतो. पीटर सीडल आणि हिलफेनहॉसची साथ त्याला मिळणार आहे. ऑफस्पिनर नॅथन लिओनकडूनही कांगारुंना आशा असणार आहे. तर रिकी पॉन्टिंग, मायकल हसी आणि मायकल क्लार्कवर मिडल ऑर्डरची भिस्त असेल. डेव्हिड वॉर्नर ओपनिंगची जबाबदारी सांभाळेल. दोन्ही टीम्सची बॅटींग ऑर्डर स्ट्रॉँग आहे. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं ही टेस्ट क्रिकेटप्रेमींसाठी ऍक्शन पॅक्ड ठरणार हे नक्की.

First Published: Sunday, December 25, 2011, 17:09


comments powered by Disqus