टीम इंडियाची नांगी - Marathi News 24taas.com

टीम इंडियाची नांगी


24taas.com, सिडनी 
 
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे,  हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडियाचे चार गडी झटपट बाद झालेत.  टीम इंडियाच्या 75 रन्स झाल्या आहेत.
सध्याच्या क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात पहिल्या डावात मोठ्या पिछाडीवर पडलेल्या संघाने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून मुसंडी मारल्याची उदाहरणे कमी झाली आहेत. सिडनीचे मैदान भारतीय संघासाठी लकी आहे, असे बोलले जात असले, तरी या मैदानावर झालेल्या दहा कसोटीत भारतीय संघाला फक्त एक विजय मिळविता आला आहे.
 
 
लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरसाठी हे मैदान मोठ्या धावांचे ठरले आहे. मात्र, लक्ष्मणने निराशा केली. माझे सर्वांत लाडके मैदान' या शब्दात सचिन सिडनी मैदानाचे वर्णन करतो. मला येथे पाऊल ठेवल्यावर घरच्या मैदानाचा फिल येतो, असे सचिन सांगतो. त्यामुळे सचिनच्या खेळाकडे लक्ष लागले आहे. सचिनचे महाशतर होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
 
सचिन - 23 विराट कोहली - 13 रन्सवर खेळत आहेत. 21 रन्समध्ये सचिनचे 4 फोर तडकावले. तर  गौतम गंभीरने निराशा केली. तो शून्य रन्सवर आणि वीरेंद्र सेहवाग 30 रन्सवर कॅच आऊट ! राहुल द्रविड (5),  लक्ष्मण (2) कडूनही निराशा झाली. टीम इंडियाने टॉस जिंकला आणि  बॅटींगचा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुन्हा निराशा केली.
 
इंडिया - 83/4 (30.1 ov)
 

First Published: Tuesday, January 3, 2012, 11:19


comments powered by Disqus