Last Updated: Thursday, January 5, 2012, 18:40
www.24taas.com, कराची गेल्या वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरल्यामुळे आपल्या कॅप्टनपदाचा उबग आलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा कॅप्टनपद न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आफ्रिदीने ऑस्ट्रेलियामधील ‘जियो न्यूज’शी बोलताना म्हटलं, “ कॅप्टनपद स्वीकारून पुन्हा बळी चढायची इच्छा नाही. मला टीममधील एक खेळाडू बनून खेळण्याची आणि क्रिकेटची मजा लुटण्याची इच्छा आहे.” याशिवाय माझ्या कॅप्टनपदाच्या कार्यकाळात जे काही करणं मला शक्य होतं, ते मी केलं, असंही आफ्रिदी म्हणाला.
आफ्रिदी पुढे असंही म्हणाला, “ गेल्या वर्षी मला ज्या प्रकारची वागणूक मिळाली, त्याने माझा हिरमोड झाला आहे. आता पुन्हा कॅप्टन न बनण्याचा मी निर्णय घेतला आहे.” आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश २०-२० लीगमध्ये खेळत आहे.
First Published: Thursday, January 5, 2012, 18:40